अंजनगाव सुर्जी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

अंजनगाव सुर्जी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

राज्याचे मुख्यमंत्री यांना युवा स्वाभिमान पार्टीचे महेंद्र भगत यांची मागणी

तालुका प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी

अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या 2 महिना भरापासून सततच्या पावसाने थैमान घातले असून, अनेक वेळा २४ तासांमध्ये तालुक्यात ६५ मिमी.च्या वर पाऊस पडला आहे. सततच्या पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असुन, तालुक्यात झालेल्या संततधार पावसाने पिकांची आंतर मशागत करता आली नसल्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले असल्याने शेतातील पिक जळाले आहे. अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात पिके मेली आहेत.

तसेच तालुक्यातील संत्रा, केळी, कपाशी, सोयाबीन आणि तुर या सर्व महत्त्वाच्या पिकांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. गेल्या हंगामात शेतमालास भाव नसल्यामुळे शेतकरी आधीच आर्थीक संकटात आलेला असुन, यंदा झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे संपुर्ण तालुक्यातील शेत पिकांच्या नुकसानीचे महसुल प्रशासनाच्या वतिने तात्काळ पंचनामे करुन, अंजनगाव सुर्जी तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहिर करुन, फळ बागेला हेक्टरी २ लाख तसेच जिरायती पिकांना हेक्टरी १ लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे महेंद्र भगत यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

Spread the love
[democracy id="1"]