प्रेम किशोर सिकची विद्यालय व माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयात वकृत्व स्पर्धा संपन्न
अमरावती येथील नामांकित श्री गणेशदास राठी छात्रालय समिती अमरावती द्वारा संचालित श्री प्रेमकिशोर सिकची विद्यालय व माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त “शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी लाभाच्या योजना योग्य की अयोग्य” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व कैलासवासी श्रीमान सेठ रायबहादूर गणेशदासजी राठी यांच्या प्रतिमा पूजनाने विद्यालयाच्या श्रीमती सीमा व्यास, श्रीमती गीतांजली तिवारी, श्रीमती नीता मुंधडा प्रा. विद्या बोंडे ( जाधव) यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले गणेशदास राठी छात्रालय समितीचे उपाध्यक्ष आदरणीय श्री जुगल किशोरजी गट्टाणी साहेब यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राजेश पवार यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी जुगल किशोरजी गट्टाणी यांनी वार्षिक स्नेहसंमेलना मधील स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लाभलेले मोठे व्यासपीठ आहे ज्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या कलागुणांचा सर्वांगीण विकास साधू शकतात असे मत व्यक्त केले.
“शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी लाभाच्या योजना योग्य की अयोग्य” या विषयावर आयोजित स्पर्धेचे परीक्षण माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. श्रीमती विद्या बोंडे ( जाधव) व गणेशदास राठी विद्यालयाच्या श्रीमती नीता मुंधडा यांनी केले स्पर्धेमध्ये हर्ष सावळीकर, पार्थ गायकी, सार्थक लंगडे, तनिष्क पांडे, साई औसेकर, राशी आसोलकर, तेजस्विनी वैद्य, आराध्या कोकाटे, उमेश वाकडे, संस्कृती कुचे, ओम गावडे, तनुजा तायडे,अक्षरा गतफणे अनघा नेतनराव, स्नेहाली धवणे, गौरी ठाकरे, चैतन्य वानखडे, सार्थक मोहोड, रिद्धी शिरभाते, जयश चकोले, रुद्र कोल्हे, हे विद्यार्थी सहभागी झाले या स्पर्धेमध्ये तनिष्क अश्विन पांडे याला प्रथम तर जयश योगेश्वर चकोले याला द्वितीय क्रमांक मिळाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले स्पर्धेचे परीक्षक म्हणून माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. विद्या बोंडे ( जाधव) व गणेशदास राठी विद्यालयाच्या श्रीमती नीता मुंधडा यांनी काम पाहिले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकृत्व स्पर्धेचे आयोजक श्री सुरेंद्र गणोरकर व श्रीमती मोना इन्नानी यांनी केले तर आभार श्रीमती मोना इन्नानी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विद्यालय व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)