चिमुकल्यांना दिले वृक्ष संगोपनाचे धडे उडान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जिल्हा परिषद शाळा दहिगाव रेचा येथे आयोजन

चिमुकल्यांना दिले वृक्ष संगोपनाचे धडे

उडान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जिल्हा परिषद शाळा दहिगाव रेचा येथे आयोजन

https://m.indiamart.com/impcat/multi-speed-rotavator.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=0724&utm_content=107

महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी

वृक्षारोपण ही काळाची गरज असून लहान मुलांमध्ये त्या विषयी आवड निर्माण व्हावी म्हणून “चिमुकल्यांची रोपवाटिका ” असा उपक्रम अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा येथील जिल्हा परीषद शाळेत राबविण्यात आला.
उडान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे इयत्ता १ ते ४ मधील लहान मुलांना घरच्या घरी बिन खर्चाची रोपवाटिका कशी तयार करायची, रोपांचे संगोपन कसे करायचे, आणि रोपे तयार झाल्यानंतर त्याची लागवड कशी करायची या संपूर्ण विषयावर उडान चॅरिटेबल ट्रस्ट च्या संचालिका सारीका ज्ञानदेव धामोळे आणि सहसचिव अक्षय धुळे यांनी मार्गदर्शन केले. आणि लहान चिमुकल्यान पासून हसत खेळत रोपवाटिका तयार करून घेण्यात आली. रोपवाटिके मध्ये आंबा ,गोड बादाम, निंब, अशोक, जांभूळ, चिंच, आधी रोपे तयार करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका दिपाली जुनगरे तसेच सहाय्यक शिक्षिका कल्पना मसणे , शिक्षक मोहन हिरुळकर, योग शिक्षिका ज्योती धुळे सहीत आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाला यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर धामोळे, केयुर पटेल, सागर योगराज सरोदे,चैताली सावरकर, प्रदीप इंगळे ,सुनीता प्रदीप इंगळे, यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच कृष्णाली राजेश भगत ,अमृता शंकर बुढळकर आज्ञा गजानन भगत,आदर्श विजय पवित्रकार, सर्वज्ञ गणेश भगत या सर्व लहान चिमुकल्यांनी पण खूप मेहनत घेतली.

Spread the love
[democracy id="1"]