विद्यार्थ्यांनी संत विचार आत्मसात करावे जयकुमार चर्जन

विद्यार्थ्यांनी संत विचार आत्मसात करावे….
जयकुमार चर्जन

https://m.indiamart.com/impcat/samsung-mobile-phones.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=0724&utm_content=88
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी

संतांचे आंदोलन नुसते भक्ती पुरतेच मर्यादत नसून ते समाज परिवर्तनाचे आंदोलन असल्याने आजच्या विद्यार्थ्यांनी संत विचार आत्मसात करावे असे प्रतिपादन लेखक जयकुमार चर्जन यांनी येथे बोलतांना व्यक्त केले . ते क्रांतिज्योती ब्रिगेड शाखा अंजनगाव तालुका,द्वारा आयोजीत संत सावता महाराज स्मृतीदिना निमित्य गुणवंत विद्यार्थी तथा विविध क्षेत्रातील यशवंत मान्यवरांचा सत्कार समारंभात बोलत होते . येथील एकविरा संस्थान सभागृहा मध्ये गेल्या दि.३/८/२०२४रोजी हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
पुढे बोलताना जयकुमार चर्जन म्हणालेत की ,संत शिरोमणी सावता महाराजांचे स्वाभाविक वेगळेपण हे त्यांच्या अभंग रचनांमधून दिसून येते . त्यांनी भक्तीला कर्माची जोड देऊन आपला व समाजाचा ही प्रपंच पारमार्थिक केला .’ स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातोहात ‘ हा कर्मवाद महाराजांच्या वृत्तीतून व कृतीतून ही आपणास दिसून येतो. सावता महाराजांच्या कर्मप्रधान व भक्तिमार्गी शिकवणीचा आणि जीवनकार्याचा परामर्ष घेतला असता त्यांची जीवनदृष्टी पुरोगामी होती तर शिकवण कर्तव्यनिष्ठेला व सामाजिक नैतिकतेला पोषक होती.त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासातच मग्न राहून यशाचे शिखर गाठावे . पुढे बोलतांना चर्जन म्हणाले की, संत सावता महाराज वर्णजाती विरुध्द बंड करणारे होते . त्यांनी येथील जातव्यवस्थेविरुद्ध केलेला विद्रोह त्यांच्या अनेक अभंगांतून स्पष्टपणे जाणवतो .
ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते.हा अधिकार सर्वांना असल्याचे त्यांनी या अभंगात मांडले आहे . त्यामागे ‘ न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची ’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. वारकरी संत विठ्ठलाचे नावाने कितीही एकत्र येत असले तरी वर्ण , जाती, कुळ यांवरुन अनेक संतांचा छळ झालेला आहे . ज्ञानेश्वर ,चोखा महाराज आदी संतांनाही तत्कालीन वर्णजात व्यवस्थेने छळलेले आहे .तरीही त्यांनी आपले कार्य थांबविले नाही . यासाठी नव्या पिढीने संतविचार वाचून समजून घेण्याची खरज आहे .अभंग हे संतांचं विचारधन आहे . संतांनी वारकऱ्यांसाठी तयार केलेली ती एक प्रकारची लिखित आचारसंहिता आहे . वारकरी पंथांचे ते उच्चतम व श्रेष्ठ असे मानवीय तत्वज्ञान आहे .त्यात मानवी कल्याणाचीच भाषा आलेली आहे. आणि त्यामुळेच संत वाङ्मयात अभंगांचे स्थान अगदी वरचे राहिले आहे . त्यातील ईश्वरभक्ती , सर्वाप्रतीची करुणा , प्रेम , समता अशा मानवतावादी जीवनमूल्यांमुळे संतांचे अभंग सामान्य जनांत अगदी सहजपणे रुढ झाले असल्याचेही चर्जन यांनी आपल्या मनोगतात सांगितले . त्यांनी क्रांतिज्योती ब्रिगेडच्या सामाजिक कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले . क्रांतिज्योती ब्रिगेड संघटना गेल्या ४० वर्षापासून महिलांचे संघटन चालवत आहे . प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे, वधुवर सूचक मेळावे घेणे,चर्चासत्र आयोजित करणे अशा उपक्रमातून समाज जागृती व संघटन करणाऱ्या ॲड नंदेश अंबाडकर यां चे त्यांनी सावित्री शक्तीपीठावतीने कौतुक केले .
यावेळी बोलतांना सोहळ्याचे उद्घाटक व क्रांतिज्योती ब्रिगेडचे संस्थापक ॲड. नंदेश अंबाडकर यांनी गुणवंत व यशवंताना शुभेच्छा देत त्यांना अपार मेहनत व कष्ट करण्याचा कानमंत्र दिला .तर शीला चर्जन यांनी ज्ञान ज्योती सावित्रीमाईंमुळेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत असल्याचे सांगून समाजाचा उच्च शिक्षणाचा टका वाढला पाहिजे असे सांगून सावित्री शक्ती पीठाच्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली . अध्यक्षीय मनोगतात रमेश पांडे यांनी क्रांतिज्योती संघटनेचे सामाजिक कार्याची प्रशंसा करत प्रावीण्य धारकांना शुभेच्छा दिल्यात.यावेळी एकूण ४८ गुणवंत व यशवंताना जयकुमार चर्जन लिखित ‘ अवघी विठाई माझी ‘ हे पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष – रमेश पांडे अध्यक्ष,एकविरा देवी संस्थान, मुऱ्हादेवी ॲड्.नंदेश अंबाडकर संस्थापक, क्रांतिज्योती ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य
प्रमुख अतिथी – ओमप्रकाश अंबाडकर,प्रदेश समन्व क्रांतिज्योती ब्रिगेड, अमरावती
प्रा. सुरेशराव यावले, प्रदेश संघटक,सुभाषराव मालपे जिल्हाध्यक्ष ,पंजाबराव फरकाडे महानगर अध्यक्ष कांतिज्योती ब्रिगेड, ऍड प्रभाकरराव वानखडे, अध्यक्ष कृषक आघाडी अमरावती,जयकुमार चर्जन, सत्यशोधक लेखक, परतवाडा,शीला चर्जन, राष्ट्रीय उपाध्यक्षा सावित्री शक्तीपीठ, पुणेसह विविध मान्यवरांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती.सूत्रसंचलन – कु. प्रियाश्री खलोकार,आभार प्रदर्शन – अनिल वऱ्हेकर यांनी पार पाडले .

Spread the love
[democracy id="1"]