भाजपा चे माजी आ.रमेश बुंदीले यांची दर्यापूर मतदारसंघात चर्चा
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी
येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येतात तसतशा प्रमाणात उमेदवारांची इच्छा व गर्दी वाढत आहे परंतु दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी येथील नागरिकांनी माजी आमदार रमेश बुंदिले यांची पसंती दर्शविली असून भाजपाने माजी आमदार रमेश बुंदिले यांनाच निवडणूक रिंगणात उतरावे अशी चर्चा सध्या दिसत आहे.
जन,आणि जन प्रतिनिधी यांच्या आकडेवारी नुसार गेल्या दहा वर्षांत दर्यापूर आणि अंजनगाव मध्ये कोणी कसे विकास कार्य केले कोणता प्रतिनिधी विधान सभेला खरोखर न्याय मिळऊन दिलाअशी चर्चा असताना 5 वर्ष सत्तेत राहुन तर 5 वर्ष जनसेवक म्हणून कार्य करीत नागरिकांची अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न केला तशी चर्चा केली असता त्यांच्या आकडेवारी नुसार बऱ्याच नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी सांगितले की माजी आमदार रमेश बुंदिले यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकास निधी तालुक्याला दिला तर प्रत्येक गावात त्यांनी निधी प्रमाणे कार्य केले परंतु भ्रष्टाचार मुक्त व जन हितकारी नेत्याला स्वतः केलेल्या कामाचा गाजा वाजा न करता जनतेने केलेल्या मागणी नुसार त्यांनी 2014 ते 2019 जिल्ह्यातून दर्यापूर आणि अंजनगाव साठी सगळयात जास्त निधी आणला असुन तो तालुक्याला मिळत गेला परंतु अनाठायी चर्चा करत विरोधकांनी लोकांना त्यांचे केलेले विकास कार्य समजु दिले नाही तर ते ही समजु शकले नाही विभागीय विद्युत पुरवठा अधिकारी असलेल्या व समाज हिताचे रक्षण करणाऱ्या भ्रष्टाचार मुक्त व जनहितकरी नेत्याला गेल्या निवडणूक रिंगणात मध्ये थोड्या फरकाने पराभव पत्करावा लागला परंतु आता दोन्हीं तालुक्यातील भाजप कार्यकारणी सहीत तालुक्यातील नागरिकांनी माजी आमदार रमेश बुंदिले यांची पसंती दर्शविली असून तशी चर्चा ही करत आहेत.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)