दि.१५ जुलै २०२४
प्रति
निवेदन
वन विभाग जिल्हाधिकारी अकोला जिल्हा यांना,
विषय..
जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीत नुकतंच उगवून आलेले कोवळे पीक, हरणी,रोही,रानडुक्कर,अनेक जंगली प्राणी शेतीत घुसून आलेलं पीक नासाडी करून उध्वस्त करत आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत निवेदन..
https://dir.indiamart.com/impcat/borewell-submersible-pump.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=64&utm_term=industrialsupplies
महोदय
अगोदरच निसर्गाच्या लहरपणामुळे हातबल असलेला शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रव्यामुळे हैराण झाला आहे,संकटात आला आहे आता त्यांच्यासमोर आणखी एक नवीन संकट उभा राहिला आहे जिल्ह्यातील अनेक भागात उगवून आलेले कोवडे पिकं,हरणी,रोही,रानडुक्कर,आधी वन्यप्राणी नासधूस करत फस्त करत आहे नुकसान केलेले पीक एक टक्काही कामी येत नाही. वन्य प्राणी शेतीमाल मातीमोल करतात व शेतकऱ्याला त्याकडे उघड्या डोळ्याने पाहण्याखाली दुसरा पर्याय नसतो यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड पिकाचे नुकसान होत
आहे,शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झालं असून या शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट ओढवले आहे. पहिल्याच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढून सावकारा जोडून कर्ज काढून घरातले सोने नाणे गहाण ठेवून शेतीची पेरणी केली, आणि त्या पेरणीवर वन्य प्राण्यांनी कळपचे कळप घुसून उगवलेलं पीक उध्वस्त केलं आता दुबारा पेरणी करण्याची परिस्थिती शेतकऱ्यावर निर्माण झाली आता शेतकरी पैसे कुठून आणणार.?. शेतकरी राजावर आता आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली.?. या संकटातून शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे त्यांचं झालेलं नुकसान पंचनामा करून मदत जाहीर केली पाहिजे आणि वन्य प्राण्याचा बंदोबस्त केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही मायबाप सरकारने शेतकऱ्याला तात्काळ मदत जाहीर करावी अशी आमची सम्राट अशोक सेनेकडून मागणी,
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
,,आकाश दादा शिरसाट,,
निवेदन देता वेळेस ज्येष्ठ नेते,जी.पी.सावंग,मनोज भाऊ शिरसाट, देवेश भाऊ पातोडे,राजकुमार भाऊ शिरसाट,युवराज भाऊ शिरसाठ,गणेश भाऊ शिरसाठ,शुभम भाऊ गोपनारायण,मनोज भाऊ इंगळे,सिद्धू मेश्राम,नागसेन शिरसाट,साहिल गोपनारायण,मोहित मोहोळ,अनिकेत इंगळे,आदीसह अनेक कार्यकर्ते निवेदन देता वेळेस उपस्थित होते
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)