पी.आर.पोटे.पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनीकडून वडगांव(माहोरे) येथे वृक्षारोपण
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी
स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून वडगांव(माहोरे) येथे पी.आर.पोटे.पाटील कृषी महाविद्यालय, अमरावती येथील कृषी कन्या सायली गवळी, वेदीका वानखडे, ऋतूजा राऊत, अनुजा भगत, ईशश्री चौरागडे व गायत्री काळे यांनी वृक्षारोपण व कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी गावातील सरपंच माला माहोरे या उपस्थित असून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आपल्या जीवनात वृक्षाचे महत्त्व साधारण नसुन झाडेच आपले खरे मित्र आहेत व वृक्षलागवड ही काळाची गरज आहे असे सरपंच माला मोहोर यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाकरीता पी.आर.पोटे.पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नितेश चौधरी, कार्यक्रम समन्वयक श्वेता देशमुख, कार्यक्रम अधिकारी मोनाली पोटे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.