कृषी व कृषीसंलग्न विषयाच्या पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर (श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात समुपदेशन व ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा)

कृषी व कृषीसंलग्न विषयाच्या पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
(श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात समुपदेशन व ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा)
सिइटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक पदवी प्रवेशपूर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी,उद्यानविद्या व कृषीसंलग्न विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाकरिता केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्यातील शासकीय, अनुदानित तसेच विना अनुदानित महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १५जुलै,२०२४ पर्यंत www.agri2024.mahacet.org, www.. mahacet.org, www..mcaer. org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहे.२४ जुलै ला अंतिम मेरिट यादी प्रसिध्द करण्यात येणार असून २७जुलै, 2 ऑगस्ट, ८ऑगस्ट या दिनांकाला गुणवत्तेनुसार तीन फेऱ्यात प्रवेश होतील. तसेच १६ऑगस्ट पासून जागेवर प्रवेश फेरी होणार असून संस्थास्तरीय प्रवेशफेरीस दिनांक १८ऑगस्ट पासून सुरुवात होईल. या संपूर्ण प्रक्रियेची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी ,याकरिता श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय,शिवाजी नगर, अमरावती येथे समुपदेशन केंद्राची स्थापना करून ऑनलाईन अर्ज भरून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेकरिता अधिक माहितीकरिता प्रा. प्रहेश देशमुख, मोबाईल क्रमांक 9860333603, प्रा. शेखर बंड,9765469889, सौ. कल्पना पाटील,9403116029 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य, चंद्रशेखर देशमुख यांनी केले आहे.

Spread the love
[democracy id="1"]