इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थींना अनुदान दया

इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थींना अनुदान दया

तहसीलदार यांना सामाजिक कार्यकर्ते संघरतन सरदार यांचे निवेदन

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी

https://m.indiamart.com/impcat/npk-fertilizer.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=0624&utm_content=27

इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांना कधी कधी १२००/- रु तर कधी कधी काहीच मिळत नाही तर वेळेवर पुरेसे अनुदान मिळत नसल्याने लाभार्थ्यांची बिकट परिस्थिती आहे तरी सुद्धा तहसीलचे हेलपाटे घेत चकरा मारावे लागतात परंतु अजुनही बरेचसे लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. लाभार्थी हे अपंग, विधवा, रोगी, परितक्ता आणि वयोवृद्ध असुन काही लाभार्थ्यांना उर्वरित थकीत रक्कम मिळाली परंतु बरेचसे लाभार्थी थकित रक्कम पासून वंचित आहेत. लाभार्थी हे तहसीलमध्ये चक्रा मारत असून तहसीलचे अधिकारी आणि कर्मचारी लाभार्थ्यांना बँकेमध्ये पाठवत आहेत परंतु बँकेचे कर्मचारी पैसे आलेच नाही म्हणून आल्या पावली परत पाठवत आहेत. नैराश्या मुळे त्यांच्यावर शासनाच्या नाकर्तेपणामुळे हलाखीचे जीवन वाट्याला येत आहे. संजय गांधी, श्रावण बाळ प्रमाणे नियमित अनुदान या लाभार्थ्यांना मिळणे गरजेचे व आवश्यक आहे. अंजनगाव तहसील मध्ये मार्च महिन्यामध्ये नवीन लाभार्थ्यांची बैठकी द्वारे निवड झाल्याने बरेचसे लाभार्थी पात्र असून सुद्धा या लाभापासून आदेश पत्र न मिळाल्यामुळे सदर योजनेपासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांना तातडीने आदेश पत्र देऊन अनुदान मिळून द्यावे अशी मागणी आज दि २८/६ रोजी तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे सामाजिक कार्यकर्ते संघरतन सरदार यांनी केली आहे.

Spread the love
[democracy id="1"]