श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले गांडूळ खताचे महत्त्व.
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाचे सातव्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव प्रशिक्षण अंतर्गत बसलापुर गावातील राहुल बेलसरे यांच्या गांडूळ खत प्रकल्पाला भेट देऊन ,तेथील उपस्थित शेतकऱ्यांना गांडुळ खताचे नियोजन व त्याचे महत्त्व सांगितले,आजच्या रासायनिक खताच्या वापरामुळे शेतातील गांडूळ नाहीसे होत आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना गांडुळ खत व्यवस्थापन करून याच खताचा वापर करून शेती सेंद्रिय पद्धती कडे वळावी व कमी खर्चात भरघोस उत्पन्न घ्यावे याबाबत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे प्रश्न सोडविले.. तेथील उपस्थित शेतकरी अमोल आखरे, मोहनराव दुबे,शुभम आखरे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य:- श्री .सी.
एम. देशमुख
व विभाग प्रमुख:- सौ.मिरा ठोके
यांचे मार्गदर्शन लाभले
उपस्थीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे विद्यार्थी.
यश ठाकरे,अनिकेत डीवरे,हरिओम वाठ,आदित्य पवार, रिशी शहा,सुजल परिमल, अनवेश पवार, अश्लेष वानखडे, अयान शेख हे विद्यार्थी उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)