काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी खालील प्रमाणे प्रमुख मागण्या उपस्थित केल्या.
राज्यातील महाभ्रष्टयुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी.
राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात व पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे.
पवई येथील झोपडपट्टीवर नियमबाह्य कारवाई करणाऱ्या मुजोर मनपा अधिकारी, पोलीस अधिकारी व बिल्डरवर एससी, एसटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत व त्यांना निलंबत करावे.
या शिष्टमंडळात नानाभाऊ पटोले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काँग्रेस,प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, खा.बळवंत भाऊ वानखडे,खा. शोभा बच्छाव, खा. वसंतराव चव्हाण, आ. मोहन हंबर्डे, आ.वजाहत मिर्झा, आ. धीरज लिंगाडे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ. विरेंद्र जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, NSUI चे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, राजेश शर्मा, रमेश शेट्टी, रमेश कीर, प्रमोद मोरे, सचिव झिशान अहमद, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुध्द ऊर्फ बबलू देशमुख, प्रमोद डोंगरे, संदीप पांडे, आकाश जाधव, डॉ. गजानन देसाई, धनराज राठोड, मदन जाधव आदी उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)