चिंचोली बुजरुक मधिल शंभर वर्षा आधीचे कडु लिंबाचे झाड तोडले

चिंचोली बुजरुक मधिल शंभर वर्षा आधीचे कडु लिंबाचे झाड तोडले

महेन्द्र भगत उपसंपादक अंजनगाव एक्स्प्रेस

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली बुजरूक येथिल 100 वर्षा आधीचे कडु लिंबाचे झाड ग्रामपंचायत मधिल दोन सदस्यांनी कोणतीही परवानगी किंवा कोणताही ठराव न घेता परस्पर तोडण्यात आले असुन त्याचा लकडा ही विकण्यात आला आहे.

https://dir.indiamart.com/impcat/john-deere-harvester.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=36&utm_term=agriculture&farming
एकी कडे शासन प्रशासन झाडे लावा झाडे जगवा च्या घोषणा देत असते तर दुसरी कडे 100 ते 150 वर्षा पूर्वीच्या झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हास करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शासन स्तरावरून झाडे लाऊन जगविण्या साठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन रोजगार हमी योजने अंतर्गत गावो गावी झाडे लावण्याचा उपक्रम राबवित असते परंतु प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी साधी पाहणी सुद्धा करत नसल्याने किती झाडे लावण्यात आले आणि किती झाडे जगले न पाहताच उपक्रमावर झालेला निधी मात्र तात्काळ काढून त्याची विल्हेवाट लावण्यात गुंग असतो असा अनागोंदी कारभारामुळे खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने प्रदुषणातही वाढ झाली आहे आहे.

https://dir.indiamart.com/impcat/john-deere-harvester.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=36&utm_term=agriculture&farming
तोडण्यात आलेले कडु लिंबाचे झाड हे श्रीमती कौशल्याताई बारब्दे विद्यालयाच्या कंपाऊंड वॉल च्या बाजूला असल्या कारणाने कोणत्याही प्रकारे अडचण नसुन 100 वर्षा आधीचे झाड तोडण्यात आले एवढ्या वर्षाचे झाड तोडणे कायद्याने गुन्हा असुनही मोठ्या प्रमाणात तालुक्यात झाडांची कत्तलीत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
संबंधीत चिंचोली बुजरूक येथिल रहिवाशी रोशन चंद्रप्रकाश बाबनेकर यांनी विना परवाना तोडलेल्या झाडाची तक्रार वनविभागा कडे केली असुन घटनेचा पंचनामा करून दोषीवर दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे. या संबंधी ग्रामसेवक यांना विचारणा केली असता कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया दिली नाही.

Spread the love
[democracy id="1"]