दहिगाव रेचा येथील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवत्तेची परंपरा कायम
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दि दयाराम पटेल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दहिगाव रेचा येथील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या एच.एस.सी परीक्षा मध्ये कला शाखेचा निकाल हा 72.72 टक्के लागला असून कु.पूनम रवींद्र सावळे हिने 82 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला असुन द्वितीय क्रमांक कु. प्रेरणा सुभाषराव कराळे हिने 77.33 टक्के गुण मिळवून कायम राखला तर तृतीय क्रमांक कु.प्रगती अशोक सावळे 74.50 टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले.
तसेच मार्च 2024 मध्ये झालेल्या एस एस सी परीक्षा मध्ये शाळेचा निकाल 93.33 टक्के असून कु. स्नेहल गणेश अनोकार हिने 93.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांक कु. प्रज्ञा देवानंद सावळे हिने 88 टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले तर तृतीय क्रमांक कु. तेजल चंद्रमणी इंगळे हिने 85.40 टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन दि दयाराम पटेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनंत गुणवंतराव साबळे, सचिव जयंत गुणवंतराव साबळे व विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य एस.एन.हिरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी केले आहे व पुढील उज्वल भविष्या करिता त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)