अंजनगाव सुर्जी मध्ये सुरू झाली कारशेरींग चळवळ
सेव्ह पेट्रोल- सेव्ह लाईफ ग्रुप चा उपक्रम
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी
अंजनगाव येथील स्थानिक युवकांच्या कल्पक बुद्धीने कार शेयरींग ची भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणली असुन बाहेर गावी जातांना येताना जागा रिकामी असेल तर सेव्ह पेट्रोल, सेव्ह लाईफ या व्हॉट्सॲप ग्रुप ला कळवाचे आणि गरजु प्रवाशांना मदत करायची असा साधा सरळ, पण या धावपळीच्या युगातही सामजिक सहकार्याची सुखद जाणीव करून देणारा उपक्रम प्रारंभ झाला.
शहरातील युवा व्यावसायिक पवन सारडा यांनी हा ग्रुप स्थापन केला आणि दोन दिवसात त्या ग्रुप च्या उद्देशात स्वारस्य असलेल्या दोनशे ते अडीचशे असलेल्या व्यक्तींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अमरावती, अकोला, नागपुर सहीत इतरत्र कुठेही कामा निमित्त जाऊन एकाच दिवशी परत येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
आपल्या मालकीची कार असलेले अनेक जण एकटेच प्रवास करतात नेमका हाच मुद्दा उचलुन ग्रुप संचालकांनी त्यांना एकटे न जाता गरज असलेल्या इतरांना सोबत नेण्याचे आवाहन सफल झाले आहे.
लिंक पाहा
https://dir.indiamart.com/impcat/borewell-submersible-pump.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=64&utm_term=industrialsupplies
रात्री उशिरापर्यंत काम आटोपुन बस पकडणे कठीण झाले, तर अनेक जण या ग्रुप वर तुम्हाला आपल्या गावात परत आणण्या साठी मदतीस तत्पर राहू शकतात. तसे मॅसेज या ग्रुप या परिसरातील कार मालकानं तर्फे प्रामाणिक पणे शेयर केले जात आहेत सध्या तरी ही भन्नाट संकल्पना चांगली रुजली असुन या संकल्पनेला चांगला व मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन येत आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)