लखाड येथे रक्तदान शिबिर संपन्न स्व. माया नितीन चौखंडे यांच्या स्मृतिदिनी आयोजन

लखाड येथे रक्तदान शिबिर संपन्न

स्व. माया नितीन चौखंडे यांच्या स्मृतिदिनी आयोजन

महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथे स्व. माया नितीन चौखंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात ४० रक्तदातांनी रक्तदान केले. परतवाडा येथील डॉ. बर्मा रक्तपेढी चे डॉ. बर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. सर्व प्रथम याप्रसंगी स्व. माया नितीन चौखंडे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.

बोरवेल पंपासाठी अधिक माहितीसाठी लिंक ला क्लिक करा

https://dir.indiamart.com/impcat/borewell-submersible-pump.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=64&utm_term=industrialsupplies
एक सामाजिक कार्यकर्ता व राजकीय सहभाग म्हणून नितिन चौखंडे यांची ओळख असुन दोन वर्षा पूर्वी पत्नी शोक असतानाही परिवाराच्या माध्यमातून ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाज कार्य सर्वोतोपरी म्हणुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच बजरंग दल लखाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंजनगाव सुर्जी तालुका व समस्त लखाड ग्रामवासी, तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांनी इतर गरजु रुग्णांना रक्तपेढी मार्फत रक्त पुरवठा व्हावा कोणतेही माध्यम असो रक्तदानाची चळवळ ही अविरत चालू राहावी यासाठी नेहमी काम करत राहण्याचे या वेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राजेंद्र गायगोले, जिल्हाध्यक्ष मनसे, सुधाकर फुलंबरकर, रतन शिंगणे, मुन्ना ईसोकार, राजू गिरी, संगीता मेन, विठ्ठल चौखंडे, सुरज गोमासे, मारोती बाळापुरे, तेजस पेठे, गौरव काळमेघ, पंकज चौखंडे, अतुल सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]