अंजनगाव सुर्जी येथे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांन कडून चक्क लुट
हमी भावापेक्षा हजार ते बाराशे रुपये कमी दराने खरेदी
शासकीय खरेदी लवकर सुरु करण्याची शेतकऱ्यांची मागणी
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी
अंजनगांव सुर्जी तालुक्यात मागील दोन वर्षापासुन उन्हाळी ज्वारीचे पेरा वाढलेला असुन,मागील वर्षी सुद्धा शासकीय ज्वारी खरेदी केंद्र नसल्याने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना बेभाव कीमतीने ज्वारी विकावी लागली होती, आता सुद्धा चालु हंगामात जवळपास पंधराशे एकरावर ज्वारी चा पेरा असुन यावर्षी पण शासकीय लालफीतशाहीत ज्वारी खरेदी अडकली आहे. व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल खुल्याबाजारात बेभाव किमतीने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांमधुन शासन प्रशासना विरुध्द नाराजीचा सुर उमटत आहे.
ज्वारी पिक उत्पादनात असलेला कमी खर्च,निव्वळ ज्वारी व कडब्या स्वरुपात मिळणारी नगदी रक्कम पाहता तालुक्यात दोन वर्षापासून उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढलेला आहे व सध्या स्थितीत ज्वारी खुळणी हंगाम सुरु आहे. आणि उत्पन्न चांगले असल्याने शेतकरी थेट बाजार समितीत चांगल्या भावाच्या अपेक्षेने आणत असतांना मात्र त्याला हमी भावापेक्षा एक हजार रुपये ते बाराशे रुपये कमी मिळत आहे. यासंदर्भात अंजनगांव सुर्जी तालुका खरेदी विक्री संघामार्फत ज्वारी,मका खरेदीची नोंदणीची जाहीरात झाली.परंतु खरेदी विक्री संस्थेला नाफेड मार्फत अजुन पर्यंत आय.डी.मिळाली नसल्याने खरेदीची नोंदणी होऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांना नोंदणी केंद्रावर दस्तऐवज घेऊन नाहक हेलपाटे घालावे लागत आहे.त्यामुळे खरेदीविक्री संघाची डोकेदुखी वाढली असून.तालुक्याचा खुल्या बाजारात २१००ते २२०० पर्यत ज्वारीला भाव मिळत असुन शासकीय खरेदी चा भाव ३१८०रुपये असल्याने शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरु करण्याकरीता दबाव वाढत असताना, शासनाकडुन आय.डी.मिळाली नसल्यामुळे नोंदणी रखडल्या असुन ,लवकरात लवकर ज्वारी खरेदी नोंदणी सुरु करुण ज्वारी खरेदी करण्याची ज्वारी उत्पादक शेतकऱ्यां कडुन मागणी होत आहे.
शासकीय खरेदीएजंन्सी मार्फत ज्वारी खरेदी करण्याबाबत तहसीलदार व संबंधीत प्रशासणाकडे पाठपुरावा करणे सुरु आहे.खरेदी विक्री संघा मार्फत संपुर्ण तयारी केली आहे. जिल्हा बाजार कार्यालया मार्फत आय.डी.मिळण्यास उशीर होत आहे.आय.डी.मिळाल्या बरोबर ज्वारी नोंदणी व खरेदी विनाविलंब केल्या जाईल. गजानन भा.धोटे अध्यक्ष खरेदी विक्री संघअंजनगांव सुर्जी
लिंक ला क्लिक करून आपण पूर्ण माहिती पाहू शकता
अंजनगाव सुर्जी बाजार समिती कार्यालया कडुन शासकीय ज्वारी खरेदी करीता पाठपुरावा केला जात असून तांत्रिक कारणाने केंद्रांना आय.डी. मिळण्यास विलंब होत आहे आज किंवा उद्या आयडी मिळण्यात येईल
पवार जिल्हा मार्केटीग अधीकारी अमरावती.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)