84 वर्षीय आजोबा ने केले 65 वर्षीय आजी सोबत लग्न कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात पार पाडला विवाह सोहळा

84 वर्षीय आजोबा ने केले 65 वर्षीय आजी सोबत लग्न

कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात पार पाडला विवाह सोहळा

महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी

बोरवेल पंपासाठी अधिक माहितीसाठी लिंक ला क्लिक करा

https://dir.indiamart.com/impcat/borewell-drilling-service.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=17&utm_term=industrialplants&machinery

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथील चौऱ्यांशी वर्षीय आजोबा विठ्ठल खंडारे व अकोला जिल्ह्यातील आकोट येथील पासष्ठ वर्षीय आजी सोबत दि.10 मे ला अकोट येथे बुध्द धर्म पध्दतीने विवाह करून परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की, चिंचोली रहिमापूर येथील विठ्ठल खंडारे यांना पाच मुले व एक मुलगी सर्व विवाहीत असून विठ्ठल रावांना मुले व मुली मिळून एकूण बारा नातवंडे आहेत. विठ्ठलरावाचे वय चौऱ्यांशी वर्षाचे असुन आयुष्यातील तिसरे लग्न आहे तर त्यांच्या दोन नंबरच्या पत्नीचे चार वर्षात वृद्धापकाळाने निधन झाले तेव्हापासून विठ्ठलराव जीवनसाथी गेल्याने एकटे पडले होते त्यांनी आपल्या मुलांकडे व नातेवाकडे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु मुलांनी व नातेवाईकांनी या वयात विवाह करणास सुरवातीला विरोध दर्शवला परंतु त्यांच्या विरोधकांना न जुमानता त्यांनी विवाह करण्याचा हट्ट कायम ठेवला व आपल्या नातेवाईकांना व मुलांची संमती मिळवली अकोट तालुक्यातील पासष्ठ वर्षीय महिलेसोबत काल दि.१० ला अकोट येथे विवाह बंधनात तिसऱ्यांदा अडकले. या वयात पहिला जीवनसाथी काळाने नेल्याने पुन्हा पुन्हा जीवनसाथी मिळून पुढील आयुष्य जगण्याचा संकल्प विठ्ठलरांवनी पूर्ण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला तर या विवाहाची परिसरात चांगलीच चर्चा चालू आहे.

Spread the love
[democracy id="1"]