पाटसुल आश्रम येथे विविध देशातील मान्यवरांच्या हस्ते सुसंस्कार शिबिराचे उद्घाटन …
चोहोट्टा बाजार प्रतिनिधी पुर्णाजी खोडके
चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या पाटसूल येथे दिनांक 4 मे रोजी श्री गुरुदेव सेवाश्रम पाटसूल येथे अमेरिका ,कॅनडा ,नेदरलँड ,येथून आलेल्या विदेशी मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत सुसंस्कार वर्गाचे उद्घाटन पार पडले . वर्गाचे हे 32 वे वर्ष असून यंदा पहिल्यांदाच विदेशी पाहुण्यांची उपस्थिती व मार्गदर्शन असा सुवर्णयोग आला यामध्ये अमेरिका येथून श्री विल हॅरीस ,मार्क रेजनसल ,टिमा कुपरस्मित , तथा कॅनडा येथून नाया नॅबर्स तर नेदरलँड येथून डॅम निकोल ब्रँडम यांनी उपस्थिती दर्शवली .शेकडो विद्यार्थी मुलांना व शिक्षकांना पाहुण्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला वर्गात मुलांना ज्या पद्धतीने सुसंस्काराचे धडे दिले जातात ते एकूण व पाहून सर्व पाहुणे अवाक्य झाले . महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 18 जिल्ह्यातून मुले या शिबिरात दाखल झालेले आहेत .परिसरातील सर्व गुरुदेव भक्त सुद्धा सदर कार्यक्रमास उपस्थित होते वं .महाराजांनी म्हटल्याप्रमाणे
सबके लिए खुला है ,मंदिर यह हमारा ,देशी विदेशी योको ,मंदिर यह हमारा या भजनाची अनुभूती जिल्ह्यात पहिल्यांदाच पाटसुल आश्रम येथे आली . अध्यात्मा और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी याप्रमाणे आजच्या युगात आवश्यक त्या पद्धतीने सुसंस्काराचे धडे ह्याशिबिरात दिल्या जातात .सदर कार्यक्रमाची सुरुवात संकल्प गीताने करण्यात आली .त्यानंतर पाटसुल आश्रम सुसंस्कार वर्गाचे संचालक श्री शुकदास दादा गाडेकर यांचे प्रास्ताविक झाले त्या नंतर सर्व पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .सदर कार्यक्रमाचे संचालन पवन गवळी यांनी केले व कार्यक्रमाकरीता रमेश पंत कात्रे ,विठ्ठल सपकाळ, गुणवंत बोडखे , सचिन वांडे ,मंगेश हिवसे , किरण ईच्चे ,विष्णू इच्चे , गणेश राऊत ,ऋषभ चौधरी ,नरेंद्र नवलकर , शिवम शेवाने , सुजय वाघ आदी शिक्षक मंडळींनी मोलाचे योगदान दिले . देश विदेशातील तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असुन सदर शिबिर 30 मे पर्यंत आहे ….
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)