प्रवेशपत्र न दिल्याने विद्यार्थ्यांना ठेवले परिक्षेपासुन वंचीत
सारडा महाविद्यालयातील प्रकार
कार्यवाही करण्याची संतत्प पालकांची मागणी
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी येथिल राधाबाई सारडा महाविद्यालय हे तालुक्यातील एकमेव महाविद्यालय आहे की जेथे ग्रामीण तथा शहरी भागातील विद्यार्थी या संस्थेत प्रवेश घेऊन आपले उज्वल भविष्य घडावे या उद्देशाने सारडा कॉलेजमध्ये प्रवेश घेतात परंतु कॉलेजने शुल्क थकीत असलेल्या विद्यार्थ्यांना सत्र परीक्षेला बसू न दिल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमाच्या वार्षिक शुल्क रक्कम भरणे बाकी होते. मात्र ही रक्कम अदा केल्या शिवाय प्रवेशपत्र न देण्याचा पवित्रा कॉलेजने घेतला.परिणामी सारडा एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांवर बी.ए.विषयाच्या भाग १ चे सन२०२४ सत्राच्या परीक्षेला मुकण्याची वेळ आली. प्राचार्याच्या अडेलतट्टू धोरणाने विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र न दिल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले असल्याने संतप्त पालकांनी प्राचार्यावर कारवाहीची मागणी केली आहे.
स्थानिक राधाबाई सारडा महाविद्यालयामध्ये बि.ए.भाग १ च्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागा मार्फत शिष्यवृत्ती फॉर्म भरला,परंतु काही विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी असल्याने ते अर्ज रद्द झाले. त्यामुळे आपल्याला शिष्यवृत्ती मिळाली असे विद्यार्थी यांना वाटले होते व त्यांचे अर्ज बाद झाले परंतु याची सुचना विद्यार्थ्यांना महावीद्यालया कडुन दिल्या गेली नसल्याने वेळेवर विद्यार्थ्यांना महाविद्यालया कडुन शुल्क भरा असा तगादा लावला ,वेळेवर दिलेल्या सुचने मुळे विद्यार्थी गोंधळून गेले, विद्यार्थी फी भरण्यास असक्षम असल्याने मुलांनी सारडा कॉलेजचे प्राचार्य वशिष्ट्य चौबे यांची भेट घेतली असता हेकेखोर प्राचार्यांनी आधी फी भरा नंतर हॉल तिकीट दिल्याजाईल असे अडेलतट्टू धोरणा स्वीकारले, हाल टीकीट नाकारल्या परिणामी काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहीले आहे.विद्यार्थ्यांचा शिक्षणाशी सारडा शिक्षण संस्थेने आडमुठे धोरण अवलंबिल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित ठेवणे गुन्हा असतांना सुद्धा शिक्षणाकडे भांडवलदारी निगरगट्ट वृत्तीच्या प्राचार्यांनी काही रुपया करीता विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ केल्याचे बोलल्या जात असुन परिक्षा फी भरली नाही म्हणुन विद्यार्यांना परिक्षेपासुन वंचित ठेवता येत नाही,त्याऐवजी निकाल रोखुन धरावयास पाहीजे होता.परंतु गेड्याची कातडी पांघरलेल्या प्राचार्य यांना विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करण्यातच धन्यता वाटली व संस्थेच्या संचालकाची हुजुरेगीरी करण्यापोटी हा गुन्हा केला असुन बहुजनातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडसर आणुन विद्यार्थ्यांचे भवितव्याशी खेळणाऱ्या शिक्षणद्रोही प्राचार्यावर कारवाहीची मागणी होत आहे.तर या आधिही सीईटीच्या क्लासेस च्या नावाखाली विद्यार्थ्यानकडून भरभक्कम रक्कम घेऊन वर्षभर विद्यार्थ्यांना शिकवणी न दिल्याने संतत्प पालकांनी फसवणूक झाली म्हणुन सारडा महाविद्यालयाविरोधात पोलीसात तक्रार केली होती त्यामुळे निर्ढावलेल्या भांडवलशाहीवृत्तीच्या प्राचार्य व महाविद्यालयाच्या प्रशासनाविरोधात कारवाही करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
‘विद्यार्थ्यांचे शुल्क प्रलंबित असल्यास त्यांचे निकाल रोखून धरा. मात्र कॉलेज विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखू शकत नाही. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती आणि शिक्षण विभागाने कॉलेजकडे याबाबत जाब विचारावा. तसेच त्यांच्यावर कारवाई करावी.अशी मागणी बाधीत विद्यार्थ्यांचे पालकांनी केली.
विद्यार्थी चुकीची माहिती देत असून विद्यार्थ्यांना थकीत शुल्का बाबत पूर्वीच कळवण्यात आलेले होते.असला प्रकार महाविद्यालयात घडलेला नाही.बऱ्याच मुलांना हॉल तिकीट अभावीही आम्ही परीक्षेला बसू दिले आहे.हा आमच्यावर लावलेला आरोप आहे,मुलांना हॉल तिकीट घरी नेऊन देऊ शकत नाही,विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास महाविद्यालय प्रशासनास कळवून समस्या निकाली काढण्यात येतील,सर्व काम नियमानुकूल सुरू आहे.तर घडलेल्या प्रकाराराला विद्यार्थी स्वतःच जबाबदार असल्याचे प्राचार्यांनी सांगीतले.
वशिष्ठ चौबे प्राचार्य राधाबाई सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)