घरकुल लाभार्थींची देयकासाठी अडवणूक अंजनगाव पंचायत समितीत धक्कादायक प्रकार तक्रारदार यांनी केली चौकशीची मागणी

घरकुल लाभार्थींची देयकासाठी अडवणूक

अंजनगाव पंचायत समितीत धक्कादायक प्रकार

तक्रारदार यांनी केली चौकशीची मागणी

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी

केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत घरकुल योजना राबविण्यात येते, गरजुंना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी ही योजना राबविण्यात येते मात्र तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ही योजना राबविण्यात अपयशी ठरत आहे.
अंजनगाव सुर्जी पंचायत समितीमध्ये घरकुलअनुदानाच्या देयकासाठी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून लाभार्थींची अडवणूक होते. व पंचायत समिती घरकुल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांकडून लाभार्थींना पैशाची मागणी होत असल्याची ओरड लाभार्थींकडून होत होती.पैसे न दिल्यास घरकुल प्रस्तावही दडपने ईत्यादी प्रकार सुरू होते.या अनैतीक कर्मचाऱ्यांच्या बेधुंदशाही विरोधात सातेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सुध्दा केले होते. काही दिवस हे प्रकार थांबाल्या नंतर आदत से मजबुर प्रवृत्तींनी आपले डोके वर काढले असुन ,घरकुल लाभार्यांनी आवश्यक बाबीची पुर्तता केल्यानंतर घरकुल लाभार्थींना त्वरित अनुदान मिळण्यात येते,परंतु अंजनगाव पंचायत समितीच्या घरकुल विभागाकडून ही योजना राबविण्यात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हेतुपुरस्परपणे दिरंगाई होत असल्याचा प्रकरणे घडत असताना, धनेगाव येथील संध्या वसंत वऱ्हाडे व ईतर लाभार्थ्यांचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातुन अंजनगाव पंचायत समितीला देयक पाठवण्यात आले.परंतु पंचायत समिती कडून त्या लाभार्थींचे बॅक खात्यावर देयक वितरण करण्यात संबंधित अधिकाऱ्यांनी पाठवण्यात हेतुपुरस्परपणे दिरंगाई होत असल्याने, वारंवार विनंत्या करुण ही समंधीत विभागाचे कर्मचारी दाद देत नसल्याने लाभार्थ्यांचे वतीने सामाजीक कार्यकर्ते सचिन अब्रुक यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली असुन, घरकुल विभागाकडून दिरंगाई का करण्यात आली त्या लाभार्थींकडून पैशाची अपेक्षा होती का ? हेतूपुरस्सर दिरंगाई केली का, अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर केला का या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सचिन अब्रुक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

*प्रतिक्रिया*

धनेगाव येथील लाभार्थी संध्या वसंत वऱ्हाडे या लाभार्थींचे अनुदानाची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती कार्यालयात चौकशी केली असता अंजनगाव सुर्जी पंचायत समिती कडे दहा ते बारा दिवसांपूर्वी अनुदान पाठवण्यात आल्या चे सांगितल्या गेले पंचायत समिती येथे पाठपुरावा केला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. घरकुल विभागाची गटविकास अधिकारी यांच्या कडे चौकशीची तक्रार केली असुन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या वर कारवाई करण्यात यावी.
तक्रारदार सचिन अब्रुक.

*प्रतिक्रिया*

बोराळा येथील घरकुल खातेवर अनुदान पाठवीण्यात आले आहे.तर एका लाभार्थ्याचे खातेवर संबंधीत कर्मचारी तिनचार दिवस सुटीवर असल्याने अनुदान पाठावीण्यास उशीर झाला.कथित तत्थ आढळल्यास कारवाई होईल.
विनोद खेडेकर खंडविकास अधीकारी पं.स.अंजनगांवसुर्जी

Spread the love
[democracy id="1"]