*राज्यस्तरीय राजीव गांधी कृषि रत्न पुरस्कार वितरण सोहळा सन 2023 – 2024* *21 मे मंगळवार 2024*

*राज्यस्तरीय राजीव गांधी कृषि रत्न पुरस्कार वितरण सोहळा सन 2023 – 2024*
*21 मे मंगळवार 2024*

*(दि. 21 मे 2024 ते 27 में 2024 पर्यंत शेतकरी सन्मान सप्ताह) (स्थळ – पुरस्कार प्राप्त शेतक-यांच्या बांधावर)*

• 21 में हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान विज्ञान क्रांतीचे जनक स्व राजीव गांधी यांचा स्मृतिदिन.

स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिन राज्यातील प्रयोगशील व प्रगतशिल शेतक-यांचा सन्मान राज्य स्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार देवून साजरा.

सन 2007 पासून सातत्याने हा उपक्रम सुरू शेतकरी सन्मानाचे सलग 18 वे वर्ष. आज पर्यंत 244 प्रगतशील शेतकरी, कृषि कंपनी, शेतमजूर, कृषि वैज्ञानिक, कृषि उद्योजक, कृषि पत्रकार, महिला शेतकरी यांना सदर पुरस्कार प्रदान.

• राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कार प्राप्त 114 शेतक-यांना आज पर्यंत राज्य शासनाचे कृषि पुरस्कार प्राधान्याने जाहिर..

सदर पुरस्कार सोहळा दि. 21 में 2024 ते 27 में 2024 पर्यंत शेतकरी सन्मान सप्ताह म्हणून साजरा करणारः

सदर सोहळ्याचे आयोजन राजीव गांधी कृषि विज्ञान प्रतिष्ठान, अमरावती तर्फे होत आहे.

राज्यभरातील विविध प्रांतामधून 21 शेतकरी निवडल्या जाणार आहे. यामध्ये प्रयोगशील शेतकरी, महिला शेतकरी, कृषि वैज्ञानिक, उत्कृष्ट तिफनकरी, कृषि उद्योजक, फार्मर प्रोड्यूसर कंपनी तसेच (कृषी पत्रकारिता (प्रिंट/ इलेक्ट्रॉनिक मधून एक) अशा पध्दतीने निवड होणार आहे.

यावर्षी विशेष कृषी पुरस्कार देण्यात येणार आहे, ज्यामध्ये शेतकरी सद्भावना मित्र पुरस्कार, दुग्ध उत्पादक शेतकरी, उत्कृष कृषि अवजार संस्था, उत्कृष्ट बेलजोडी मालक, उत्कृष्ट शेतकरी मित्र कृषी अधिकारी, फळ बागायतदार, प्रगतशील आदिवासी शेतकरी, बियाणे संशोधक, फुलशेती उत्पादक शेतकरी, वनऔषधी उत्पादक शेतकरी, उत्कृष्ट गावकारभारी सरपंच, उत्कृष्ट मत्स्य पालन व्यवसायी, रानभाजी उत्पादक शेतकरी, सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी, युवा शेतकरी अशा प्रवर्गातील शेतक-यांना विशेष कृषीकार्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

राजीव गांधी कृषि प्रतिष्ठान ने शेतक-यांची निवड करण्यासाठी राज्य शासनाच्या जिजामाता कृषि भूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी व ग्रामगिताचार्या सौ. पोर्णिमाताई सवाई यांच्या अध्यक्षतेखाली 16 कृषी तज्ञांची शेतकरी निवड समिती नेमली आहे. ही समिती दि. 10 में 2024 पर्यंत शेतकयांच्या बांधावर जाऊन शेतक-यांची निवड करणार आहे.

• राज्यस्तरीय आयोजन समिती 10 मान्यवरांची नेमली आहे.

• सदर पुरस्कारामध्ये पुरस्कार प्राप्त शेतक-यांना सन्मान चिन्ह, राजीव गांधी यांची प्रतिमा, मानधन, प्रमाणपत्र, सन्मानाच्या वस्तू प्रदान करण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय आयोजनामध्ये राज्यातील प्रगतशील शेतक-यांचे पुरस्कारासाठी जवळपास 300 प्रस्ताव येणे अपेक्षित आहे.

सदर शेतकरी सन्मानाचा सोहळा हा स्व. राजीवजी गांधी यांच्या स्मृति प्रित्यर्थ होणारा देशभरातील एकमेव कार्यक्रम आहे. कृषि क्षेत्राला विज्ञानाची जोड देऊन देशातील शेतक-यांना प्रगतीचे नवे दालन उभे करण्याचे महत्वाचे कार्य स्व. राजीव गांधी यांनी केले. तेव्हा ह्या सर्व शेतकरी समाजाच्या वतीने 21 में ला स्व. राजीव गांधी यांना अभिवादन करून श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे.

सदर शेतकरी सन्मानाच्या कार्यक्रमास राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतक-यांच्या भागातील मान्यवर मंडळी, कृषितज्ञ आणि कृषि क्षेत्रातील मान्यवर यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

राज्यभरातील पुरस्कार प्राप्त शेतकरी पुरस्कार स्विकारण्यासाठी सपत्नीक व सहपरिवार सन्मानित करण्यात येणार

आहे.

*राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुस्कार शेतकरी निवड समिती.*

मा. सौ. पोर्णिमाताई सवाई

मा. प्रो.डॉ.पवित्राताई गडलिंगे

मा. श्री. जयसिंगराव देशमुख

मा. प्रा. श्री. नंदकिशोर चिखले

मा. श्री. डॉ. प्रा. अनिल ठाकरे

मा. श्री. मिलींद फाळके

मा. श्री. अविनाश पांडे

मा. श्री. अनिल ठाकरे

मा. श्री. प्रा. हेमंत डिके

मा. श्री. प्रा. अमर तायडे

मा. डॉ. दिलीप काळे

मा. श्री. भैय्यासाहेब निचळ

मा. श्री. प्रशांत डहाणे

मा. जावेद खान

मा. श्री. नामदेव वैद्य

*प्रस्ताव स्वीकारण्याबाबत संपर्क*
‘अनिकेन जावरकर – Email ID-aniketcul92@gmail.com

प्रकाश साबळे – Email In-Prakashsable123@gmail.com

मा. सौ.पोर्णिमाताई सवई -व्हाट्सएप नंबर..09766022126

मा.डॉ.दिलीप काळे व्हाट्सएप नंबर..9423424512

आपला
प्रकाश साबळे, अध्यक्ष
राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान
9823661448

Spread the love
[democracy id="1"]