विभागीय कृषी सहसंचालक यांची पान पिंपरी औषधी विकास समितीच्या शेतकऱ्यांसोबत बैठक
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी
विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यातील पान पिंपरी या औषधी पिकाच्या लागवड धारक शेतकऱ्याना नेहमी सतत भेडसावत असलेल्या समस्यांबाबत निराकरण करून शेतकऱ्यांसाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे ह्या दृष्ठिने, व शेतकऱ्यांना थोडा फार आधार मिळावा या साठी माजी राज्यमंत्री बच्च्यु कडू यांच्या अध्यक्षते खाली विभागीय समिती गठीत करण्यात आली होती, त्या अनुषंगाने दि १४/२/२०२४ ला बैठक संपन्न झाली होती
ह्यामध्ये पान पिपरी पिकाला दर्जा, त्या पिकाची पीक विम्यात तरतूद, लागवडीसाठी पीककर्जाची तरतूद, नवीन वाण संशोधन, पान पिपरी पिकाशी निगडित प्रक्षेत्र भेटी व प्रशिक्षण ई प्रमुख विषयावर चर्चा घडून आली होती.
त्या अनुषंघाने नुकतीच विभागीय कृषी सहसंचालक के सी मुळे,, जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते,ह्याचे उपस्थितीत बैठक घेण्यात आली,
या मध्ये पान पिपरी पिकाला हेक्टरी एक लाखापर्यंत कर्जाची तरतूद, तसेच पिकाला पीक विम्यामध्ये समावेश करून १५ सप्टेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान झालेल्या नुकसानीबाबत त्याची जोखीम समाविष्ठ करून प्रत्येक टप्याला ४०, ४०, २० हजार असे १ लाख रुपये प्रमाणे विमा हप्ता मिळावा, व त्यासाठी योग्य प्रकारे ट्रिगर लावन्यात यावा व विमा हप्ता हा शेतकऱ्यांना परवडणारा असावा,ई विषयावर सविस्तर चर्चा करून
त्याचा प्रकल्प अहवाल तयार करून तो कृषी विभागाकडून शासनाकडे मंजूरातीसाठी पाठवण्यात आला, या बाबत वरिष्ठ स्तरावरून कृषी विभागाकडून लवकरच मान्यता मिळणार अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे
अश्याप्रकारे प्रकल्प अहवाल तयार करून तो शासनाकडे मंजूरातीसाठी पाठवण्यात आला, ह्याबाबत कृषी विभागाकडून लवकरच मान्यता मिळणार अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे
ह्याप्रसंगी बैठकीला विभागीय कृषी संचालक के सी मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते,डॉ नितीन पटके, डॉ अजय हाते, अंकुश जोगदंड, प्र ना मोहोकार, व सु आडरे, वानखडे,कार्ड चे विजय लाडोळे, समिती सदस्य प्रभाकर ताडे, मनोहर मुरकुटे, सुभाष थोरात, संजय नाठे, वृषभ सातपुते, राजेंद्र पाटील, कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी बैठकीला उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)