उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय अंतर्गत मतदार जागृती मंच स्थापन

उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय अंतर्गत मतदार जागृती मंच स्थापन

महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी

अंजनगाव सुर्जी येथे तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अंजनगाव सुर्जी यांचे आदेशानुसार आज दि.१९ जानेवारी रोजी उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय अंतर्गत मतदार जागृती मंच स्थापन करण्यात आला आहे.
प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह सर्व कंत्राटी कर्मचारी मतदार जनजागृती मंचाचे सदस्य आहेत. कर्मचाऱ्यांनी सक्षम मतदार व्हावे व दरवर्षी, 1 जानेवारी रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व पात्र मतदारांची ओळख मतदान केंद्र परिसरात केली जाईल.या संदर्भात 18 वर्षे किंवा त्यावरील नवीन मतदारांची नावे मतदार यादीत नोंदवून त्यांना निवडणूक ओळखपत्र देण्यात येईल करिता तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे पत्रानुसार मतदार जागृती मंच स्थापन करण्यात आला आहे.तर उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय उपविभाग अंजनगाव सुर्जी अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांनी मतदार जनजागृती मध्ये सहभागी व्हायचे आहे असे लता दिलीप बारबुद्धे उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांनी यावेळी म्हटले.
मतदार जनजागृती मंचाच्या उद्घाटन प्रसंगी मतदार जागृती मंचाचे अध्यक्ष तथा उपविभागीय जलसंधारण अधिकारी लता दिलीपराव बारबुद्धे, नोडल अधिकारी तथा जलसंधारण अधिकारी चंद्रशेखर एन. गोळे, सदस्य वरिष्ठ सहायक अनिल ठाकरे, सदस्य कनिष्ठ सहायक विशाल एस.खरड, सदस्य कनिष्ठ सहायक रवींद्र बी. नाथे उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]