रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा….!! ४२ गरजू रूग्णांना आरोग्यदायी मदतीचा हात…!!

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा….!!
४२ गरजू रूग्णांना आरोग्यदायी मदतीचा हात…!!

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व स्मृती सेवाश्रम नया अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने …

दि. ११-०१-२०२४ रोजी आरोग्य शिबिर संपन्न झाले.

४२ गरजू रुग्णांना मोतीबिंदू , हृदयविकार, हरनिया, गाठीचे आजार तसेच विविध रोगावरील शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले.
या शिबिरात माहुली जहागिरी, खानापूर, विरूळ पूर्णा, चांदई, बोदड, कुंभारगाव, टाकरखेडा, नांदुरा, पथ्रोट, टाकळी, फुबगाव, खालगुणी, अचलपूर, सालोरा, कुष्ठा बु.,तिवसा, ब्राह्मणवाडा या गावातील रुग्णांनी सहभाग घेतला. या शिबिराचे आयोजन माजी जि. प. सदस्य प्रकाश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी डॉ. दिलीप काळे, डॉ. सचिन खेडकर, माजी जि. प. सदस्य मुरलीधर ठाकरे, अर्जुन भाऊ सनके, मिलिंद वंजारी, सुनंदा बाई सोनोने, उमेश उघडे, शामराव उमाळे ही प्रमुख मंडळी उपस्थित होती.
आरोग्य शिबिर यशस्वी होण्याकरिता युवा कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय साबळे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
[democracy id="1"]