साम टीव्ही चे पत्रकार अमर घटारे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

साम टीव्ही चे पत्रकार अमर घटारे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

अंजनगाव सुर्जी पत्रकार संघटनेची आरोपींवर कठोर कार्यवाहीची मागणी

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी

अमरावती शहरातील डफरीन स्त्री रुग्णालय येथे दि.५ जानेवारी रोजी वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या साम टिव्हीचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी यांच्यावर झालेल्याभ्याड हल्ल्याबाबत त्यातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे दि.८ जानेवारी रोजी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पत्रकारांनी तहसीलदार यांचेमार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि.५ जानेवारी रोजी साम टिव्ही या मराठी चॅनलचे अमरावती चे प्रतिनिधी अमर घटारे हे अमरावती शहरातील डफरिन स्त्री रुग्णालय परिसरात वराहांच्या हैदोसाचे वृत्त संकलन करिता गेले असता काही समाज कंटकांनी वृत्त संकलन करण्यासाठी अडविले व त्यांचेवर प्राणघातक हल्ला केला.तर झालेल्या हल्ल्याबाबत अमर घटारे यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून त्या हल्लेखोरां विरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करून शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पत्रकारांनी तहसीलदार मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना केली आहे.
दि पॉवर ऑफ मीडिया, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना,तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद चे पत्रकारांनी तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देते वेळी ज्येष्ठ पत्रकार शिवदास मते, मनोहर मुरकुटे, उमेश काकड,प्रविण बोके, रविंद्र वानखडे, महेन्द्र भगत, सचिन अब्रुक,मनोज मेळे, सुधाकर टिपरे,सागर साबळे, सुनील माकोडे, कुशल चौधरी, मंगेश इंगळे, श्रीकांत नाथे, पंकज हिरूळकर, प्रमोद खडे,संघरतन सरदार, श्याम कळमकर, सचिन इंगळे, सह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]