युवा स्वाभिमानी शिलेदारांचा नूतन वर्षाच्या प्रारंभी अनोखा उपक्रम

युवा स्वाभिमानी शिलेदारांचा नूतन वर्षाच्या प्रारंभी अनोखा उपक्रम,,31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस,सामाजिक बांधिलकी जोपासत युवा स्वाभिमानी शिलेदारांनी समाजापुढे ठेवला नवा आदर्श, स्वाभिमानी शिलेदार स्व.रौनक किटुकले यांनी सुरू केलेली परंपरा युवा स्वाभिमान कामगार अध्यक्ष निलेश भेंडे यांनी जोपासली
आमदार रवी राणा_खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या मार्गदर्शनात आज 31 डिसेंबर ला कुठल्याही व्यसनांच्या आहारी न जाता किंवा वायफळ खर्च न करता बेघर,रस्त्यावर राहणाऱ्या गरीब गरजूंना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट चे वाटप शहर अध्यक्ष नीलेश भेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले
सोबतच शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी,कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात शहरात विविध ठिकाणी बंदोबस्तावर तैनात असणाऱ्या पोलिस बंधू भगिनींना बिसलेरी पाणी बॉटल चे वाटप करण्यात येवून पोलिस विभगाला मानाचा मुजरा करण्यात आला
यावेळी निलेश भेंडे,अनुप खडसे,अंकुश मेश्राम,अभय ठाकूर,अभय निमाने यांच्यासह अनेक स्वाभिमानी शिलेदार उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]