तामसवाडी फाटा दर्यापूर येथील शिवछत्रपती जंगी शंकरपटाची आढावा बैठक संपन्न

तामसवाडी फाटा दर्यापूर येथील शिवछत्रपती जंगी शंकरपटाची आढावा बैठक संपन्न

22,23,24,जानेवारीला तामसवाडी फाटा अंजनगाव रोड येथे शंकर पटाचे आयोजन

प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजाराचे बक्षीस

प्रतिनिधी- दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

शेतकरी राजाचं हित जोपासणाऱ्या शिवछत्रपती जंगी शंकर पटाची आढावा बैठक शिवप्रेमी व बैलगाडाप्रेमी गोपाल पाटील अरबट यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली वर्षभर शेतात शेतकरी व सर्जा राजा जिवापाड मेहनत करीत असतो हे सत्य असून त्या सर्जा राजाचं कुठेतरी गुणगान गायल्या जावं शेतकरी व पशुप्रेमी यांचा आनंद द्विगुणित करण्याकरिता या शिवछत्रपती जंगी शंकर पटाचे आयोजन दर्यापूर अंजनगाव रोडवरील तांमसवाडी फाटा येथे करण्यात आले आहे या भव्य जंगी शंकर पटामध्ये सुमारे सहा लाखाची भव्य लय लूट असून महाराष्ट्रातून नामांकित बैल जोड्या यावर्षी शंकरपटात धावणार आहेत अ ,गट,क गट, गावगाडा अशी विभागणी करण्यात आली आहे तर परिसरातील बैलजोड्यांचा सुद्धा उत्साह वाढवण्यासाठी विशेष आकर्षक बक्षिसे सुद्धा आयोजकांनी ठेवली आहेत प्रथम क्रमांकाला 1 लाख 11 हजार रुपये इतके बक्षीस आयोजकांनी ठेवले आहे यासह तीस ते चाळीस विविध रकमेचे बक्षिसे सुद्धा बैल जोडी मालकांना देण्यात येणार आहे प्रेक्षकांचा आनंद टिकवून ठेवण्याकरिता औरंगाबाद येथील घडीमालक पळशीकर यांचे समालोचन करण्यासाठी व्यासपीठावर दिसणार आहेत यासाठीची पूर्व नियोजन सभा ही गोपाल पाटील अरबट यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती शंकर पटाची रूपरेषा तारीख बक्षिसे यासह विविध नियोजन सुद्धा करण्यात आले आहे तालुक्यातील बैलगाडा प्रेमींनी शिस्तीत आणि आनंदाने शिवछत्रपती शंकर पटाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी श्रीधर पाटील अरबट,गणेशराव घोगरे, ज्ञानेश्वर अरबट, विजू मोहोड, राजू अरबट, गणेश साखरे,विठ्ठल अरबट, गजानन अरबट ,नामदेव अरबट, भगतसिंग खांबरे ,साहेबराव सावरकर ,केशवराव अरबट, पुरुषोत्तम अरबट, शरद अरबट, विशाल पोरे ,विलास साखरे, अतुल सगने ,नंदू राऊत, शाम अरबट ,प्रसाद अरबट, नंदू अरबट ,हेमंत उमाळे, सौरभ राऊत ,अभिषेक अरबट, सोपान अरबट ,नागोराव केचे, तेजस अरबट ,अविनाश अरबट, गणेश गावंडे ,विनय गावंडे ,राहुल बुम्भर, सचिन कोरडे, सौरभ वायझाडे,नीरज नागे, दिनेश अरबट, सुमित अरबट, सुधाकर अरबट, अमोल अरबट, सुधीर अरबट, शिवनाथ काळमेघ, पुरुषोत्तम अरबट, निरंजन कोलखेडे, बंडू कोकणे, चंदू कोकणे, विजू अरबट ,भूपेंद्र अरबट, सरफराज शहा, पंजाबराव नागे ,अंकुश अरबट, सचिन अरबट, शिवाजी झापे, बाळकृष्ण अरबट ,एकनाथ अरबट, अमोल अरबट, कृष्णा अरबट ,दिनेश वडकर ,किशोर दूतोंडे ,कमलेश वानखडे, गजानन चांदुरकर ,अतुल वडाळ, गोकुळ चांदुरकर ,गोकुळ अरबट, कृष्णा झापे ,दीपक झापे ,विनोद अरबट, कैलास गोळे, धीरज चांदुरकर ,जगदंब अरबट, संतोष अरबट, जगदीश ब्राह्मणकर, शाम ब्राह्मणकर, सह बैलगाडा प्रेमी उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]