माजी नगरसेवक उद्धवराव नळकांडे यांनी 31 डिसेंबर निमित्ताने केला ज्येष्ठ नागरिकांचा आनंद सोहळा साजरा

माजी नगरसेवक उद्धवराव नळकांडे यांनी 31 डिसेंबर निमित्ताने केला ज्येष्ठ नागरिकांचा आनंद सोहळा साजरा

प्रतिनिधी- दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

दर्यापूर नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष माजी नगरसेवक उद्धवराव नळकांडे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याला सामाजिक जीवनात प्राथमिकता दिली आहे तर 31 डिसेंबर हा दिवस वर्षाचा शेवटचा दिवस असतो शहरासह ग्रामीण भागात तरुणाई मोठ्या हर्ष उल्हासाने आपला आनंद साजरा करीत असतात सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाच्या स्वागता करिता तरुणाईचा सर्वाधिक कल असतो परंतु माजी नगरसेवक उद्धव नळकांडे यांच्यावतीने जेष्ठ नागरिक आनंद सोहळ्याचे 31 डिसेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या आयोजनामुळे जेष्ठ नागरिकात नवचैतन्य व चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता तर उपस्थित असलेल्यांनी उद्धवराव नळकांडे यांचे यथोचित आभार मानले व आशीर्वाद सुद्धा दिले या कार्यक्रमात जयकिरणजी गावंडे यांना अध्यक्ष पदाचा मान देण्यात आला तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ वसंतरावजी टाले हे लाभले होते सत्कारमूर्ती बाबाराव पाटील बरवट यांचा सत्कार करण्यात आला ,आमंत्रित पाहुणे नानासाहेब राऊत यांच्या उपस्थितीत शेकडो ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा चिंतामणी मंदिर अमरावती रोड येथे साजरा करण्यात आला उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प देऊन ज्येष्ठ नागरिकांचा जीवनपट प्रकट करण्यात आला सदर कार्यक्रमात आयोजक उद्धवराव नळकांडे यांच्यावतीने जेवणाचे सुद्धा प्रयोजन करण्यात आले होते अशाच प्रकारे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा भविष्यात सुद्धा नित्य नेमाने साजरा होत राहील अशी ग्वाही माजी नगरसेवक उद्धवराव नळकांडे यांनी दिली सदर सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांकडून माजी नगरसेवक उद्धवराव नळकांडे यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली.

Spread the love
[democracy id="1"]