नांदुरा बु.येथे ७ लक्ष रुपयेचा OPEN JEEM चे थाटात उद्घाटन
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उदघाटीत
ग्रामीण भागातील प्रशिक्षित खेळाडू उज्वल -सुदृढ भारताचा आधारस्तंभ-उदघाटक मा.प्रकाशदादा साबळे,माजी जि.प.सदस्य
जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रीडाक्षेत्राला वाव देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध-गटशिक्षणाधिकारी डी.एन. वानखडे
नांदुरा बु ता.अमरावती येथे दि.३०/१२/२०२३ रोजी क्रीडा विभाग अंतर्गत मंजूर OPEN JEEM चे उदघाटन तसेच केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन माजी जी.प. सदस्य मा.प्रकाशदादा साबळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले..
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी प.स. अमरावती श्री.धनंजय वानखडे,सरपंचा सौ.भाग्यश्रीताई किरकटे, केंद्रप्रमुख मा.सुरेंद्रजी मेटे सर,सौ.प्रीती निंबेकर, सौ.किरण निंबेकर, वैभव उगले तसेच विस्तार अधिकारी मा.श्री.डाखोरे सर उपस्थित होते.मोठ्या संख्येने तरुण वर्ग, गावकरी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते..
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)