राजे संभाजी स्पर्धा परिक्षा केंद्रात विद्यार्थी संवाद मेळावा संपन्न
विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे -समीर वानखेडे
प्रतिनिधि : – संजय भटकर
अकोट शहरातील राजे संभाजी स्पर्धा परिक्षा केंद्र येथे दि १९ नोव्हेंबर २३ रोजी विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आय. आर. एस. समिर वानखेडे, यांच्यासह राजे संभाजी अकॅडमीचे संचालक प्रा. राजीव खारोडे, प्रा सुधीर ताकोते, डॉ धुळे, विकास पवार आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात समीर वानखेडे यांनी मी कसा घडलो यावर त्यांनी
कसे
विसृत माहिती देत विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले प्रश्न समीर वानखडे यांच्यासमोर मांडले.
विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर
राहिले पाहिजे याबाबत देखिल
व्यसनमुक्तीचा मोठा संदेश समीर वानखडे यांनी दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजे संभाजी स्पर्धा परिक्षा केंद्र अकोट व तेल्हारा येथील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)