आधुनिक अतिघन आंबा लागवडीतून शेतकऱ्यांना खात्रीशीर फायदा : डॉ. भगवानराव कापसे
(श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, आत्मा अमरावती व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम )
आजपर्यंत शेतकऱ्यांनी आंबा फक्त आपल्या घरच्या लोकांसाठी, उन्हाळ्यात खाण्यासाठीच लावला, आंबा लागवडीतून पैसा सुद्धा भेटू शकतो अशी मानसिकता सुद्धा शेतकऱ्यांची नाही आहे, त्यामुळे आंब्याला व्यावसायिक स्वरूप देण्यात येत नव्हते , परंतू आता आधुनिक अतिघन आंबा लागवडीतून शेतकऱ्यांना खात्रीशीर फायदा होऊ शकतो, याबाबतचे तंत्र
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती व कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने व वनस्पतीशास्त्र विभाग, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती यांच्या सहकार्याने डॉ . पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित आधुनिक अतिघन आंबा लागवड या विषयावरील एकदिवसीय शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद व चर्चासत्रात मा. डॉ. भगवानराव कापसे, गटशेती प्रणेते तथा संचालक केसर आंबा बागायतदार संघ, छत्रपती संभाजीनगर यांनी शेतकऱ्यांना सांगितले.केले.या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन देशमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था , अमरावतीचे उपाध्यक्ष एड. गजाननराव पुंडकर, कोषाध्यक्ष मा.श्री दिलीपभाऊ इंगोले, कार्यकारिणी सदस्य सदस्य प्रा.सुभाष बनसोड , श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी कार्यकारिणी सदस्य श्री राजाभाऊ देशमुख, महा केसर आंबा बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष डॉ. शिवाजीराव उगले, सदस्य श्री. अशोकराव सूर्यवंशी, श्री . शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती चे प्राचार्य डॉ शशांक देशमुख, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य डॉ.गजानन कोरपे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणमहर्षी कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन, हार अर्पण करुन पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.श्री.हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते डॉ.कापसे यांचा शाल, श्रीफळ, पुष्प कुंडी,स्मृतिचिन्ह तसेच भाऊसाहेबांचा चरित्रग्रंथ देवून सत्कार करण्यात आला . तसेच सर्व उपस्थित पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पकुंडी देवून स्वागत करण्यात आले. फळबाग लागवड करणारे चिखलदरा येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी श्री.गजानन शनवारे,
उदखेड येथील श्री.शाश्वत मुंदडा, शेंदूरजनाघाट येथील श्री सुधाकर बेले यांचा सत्कार करण्यात आला .आपल्या प्रदीर्घ मार्गदर्शनातून डॉ.कापसे यांनी अतीघन आंबा लागवडीचे तंत्र उपस्थित शेतकऱ्यांना विस्तृतपणे सांगितले.तत्पूर्वी हा कार्यक्रम आयोजीत करण्यामागील भूमिका श्री.राजाभाऊ देशमुख यांनी विषद केली.आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.हर्षवर्धन देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील कृषी व संलग्न महाविद्यालय अतिघन आंबा लागवड करुन एक मॉडेल फार्म शेतकऱ्यांकरिता विकसित करेल याबाबत आश्वस्त केले.भोजनानंतर डॉ. उज्वल राऊत ,सहयोगी प्राध्यापक फळशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे विदर्भातील अतिघन आंबा लागवडीस वाव, नियोजन व व्यवस्थापन या विषयावर, डॉ. अमोल झापे यांचे आंब्यावरील विविध रोग व त्यांचे प्रभावी व्यवस्थापन, या विषयावर मार्गदर्शन झाले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.शशांक देशमुख,सूत्रसंचालन प्रा.सौ.शीतल चितोडे तर आभारप्रदर्शन प्रा.निलेश फुटाणे यांनी केले.या कार्यक्रमाचा अमरावती जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी लाभ घेतला.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)