घरचेच भेदी मराठ्यांनीच मराठ्यांची वाट लावली! अ.भा.मराठा महासंघाचे अध्यक्ष जगताप यांचा आरोप

घरचेच भेदी ; मराठ्यांनीच मराठ्यांची वाट लावली!
अ.भा.मराठा महासंघाचे अध्यक्ष जगताप यांचा आरोप

अमरावती- मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना झाली ती तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यामुळे. ‘कुलाबा’ जिल्ह्याचं नाव ‘रायगड’ करणं असो वा लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणण्याची घोषणा असो, तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांनी छत्रपती शिवाजी महारांजाचा खऱ्या अर्थाने सन्मान केला. मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक तैलचित्र लावण्यात आले आहे. हे चित्रही तत्कालिन मुख्यमंत्रीअंतुले यांच्याच काळात लावण्यात आले. देवेन्द्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री पदावर असतांना मराठा आरक्षण लागू केले होते. ते आरक्षण टिकू शकले नसले तरी गेल्या २ वर्षात त्याचा हजारो मराठा युवकांना लाभ झाला आहे. याउलट कित्येक वर्षे सत्ता उपभोगलेल्या मराठा नेत्यांनी मराठा समाजाला वाळीत टाकण्याचीच भूमिका बजावली आहे. कित्येक वर्ष सत्ता सुख उपभोगुणही मराठा समाजासाठी काहीच न करू शकलेले मराठा नेते, हे घरचेच भेदी मराठ्यांचे खरे दुश्मन असल्याचा आरोप अ.भा.मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी केला. मराठा समाजेत्तर नेत्यांनीच मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे दाखले इतिहासात उपलब्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले.

*मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद मिटवण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने पुढाकार घ्यावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांचा समूह म्हणजे मराठा”.. या तत्त्वानुसार मराठा महासंघाचे पुढील भूमिका ठरवावी – ओबीसी नेते प्रकाश साबळे यांचे परखड मत…*

दि.29/10/23 रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मध्यवर्ती केंद्रीय कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह अमरावती येथे संपन्न झाली.

*सदर सभेचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मा. विश्वंभर मारके यांनी केले.*

शहरातील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अधिवेशन नियोजन बैठक पार पडली. दिलीपदादा जगताप यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीला अ.भा.मराठा महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, खजिनदार श्रीरंग बर्गे, संपर्क प्रमुख दिलीप धन्द्रे, विदर्भ उपाध्यक्ष राम मुळे, अजय देशमुख व ओबीसी नेते प्रकाश दादा साबळे हे प्रमुख अतिथी म्हणुन व अन्य मान्यवर पदाधिकारी प्रमुखतेने उपस्थित होते.

या बैठकीला अ.भा.मराठा महासंघाचे पदाधिकारी उदयसिंह पाटील, अपूर्वा थोरात, अनुप थोरात, ज्ञानदेव पाटील, बाळासाहेब पाटील, सुभाष जाम्बड, अमोल सूर्यवंशी, सुरेश ठाकरे, रोशन सांभारे, सुनील कावरे, शिरीष कावरे, रवी मोरसे, राजू बद्रे, सतीश सुर्वे, विजय ठाकरे, राम उमेकर, निलेश जुनघरे, सिद्धिविनायक गायकवाड, शशिकांत पवार यांचेसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सदर सभेचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मा. विश्वंभर मारके यांनी केले.*

दि.29/10/23 रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मध्यवर्ती केंद्रीय कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह अमरावती येथे संपन्न झाली.

*अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मध्यवर्ती केंद्रीय कार्य करण्याची बैठक अमरावती येथे संपन्न.*

*अ.भा. मराठा महासंघाचे अमरावती जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…*

अ.भा.मराठा महासंघाचे नवनियुक्त पदाधिकारी
नाव नियुक्ती
विश्वंभर पाटील मारके जिल्हाध्यक्ष अमरावती
तुषार मळसने तालुका अध्यक्ष,अंजनगाव
निलेश उभाड महानगराध्यक्ष अमरावती
योगेश भोसले युवक नगराध्यक्ष अमरावती
निलेश जुनघरे तालुका अध्यक्ष, दर्यापूर
अक्षय जवंजाळ तालुका अध्यक्ष,चांदुर बाजार
सारंग काळमेघ तालुका अध्यक्ष,वरुड
अनिल येवले युवक तालुका अध्यक्ष,अंजनगाव
अक्षय बुरघाटे युवक तालुका अध्यक्ष,भातकुली
निलेश भुयार तालुका अध्यक्ष,भातकुली
शँतनू राऊत युवक तालुका अध्यक्ष,तिवसा
राजू बद्रे तालुका अध्यक्ष,चांदुर रेल्वे
रोशन सांभारे तालुका अध्यक्ष,अमरावती
राम उमेकर युवक तालुका अध्यक्ष,अमरावती

Spread the love
[democracy id="1"]