भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावनारी हिवरखेडची मरी ,आई,
गाय वासराच्या इतिहासातील मंदिराचा जीर्णोद्धार,
हिवरखेड चंडिका चौक येथील चंडिका माता,मरी माय मरि आई या नावाने ओळखल्या जाणारी माताचे चौकात मोठे मंदिर असून या चौकाला सुद्धा चंडिका चौक असे म्हटले जाते, या मंदिराच्या बाबत मागील काळाच्या इतिहासात गाय व वासराच्या संकल्पनेतून मंदिराचा त्याकाळी जीर्णोद्धार झाला होता असे सांगितले जाते, या ठिकाणी एक निबाचे झाड होते, व त्या झाडाखाली मातांची मूर्ती होती,तेथे नेहमी गाय येऊन बसायची त्या गायने एका वासराला जन्म दिला होता, ते वासरू मोठे होऊन त्याने आपले रूपांतर बैला मध्ये केले,तेथील पंच मंडळाने निर्णय घेतला या वासराला गरजू शेतकऱ्यांला विकून मंदिराची उभारणी करू असा निर्णय घेतला व मंदिराची त्या काळी उभारणी केली,आजच्या काळी मंदिराच्या सेवेकरांनी मोठया प्रमाणात मंदिराचा जीर्णोद्धार केला, दरवर्षी येथे गणेशोत्सव ,नवरात्री उत्सव मोठया प्रमाणात साजरा करतात,येथे नागपंचमी उत्सव साजरा केला जातो, श्रावण मासात सुद्धा कथा वाचन होते मोठ्या प्रमाणात येथे भंडारा सुद्धा होते, येथे प्रत्येक एकादशी व मंगळवारी भजने किर्तने होतात,तसेच चैत्र मासात येथे महिला भाविक आपले नवस फेडतात आरती धूप बत्ती देतात,आई भवानी,व आई मरि आई या दोन्ही मंदिरात आरत्या देऊन आपली मनोकामना पूर्ण करतात, या मंदिरात व परिसरात नेहमी शांतता व उजाळा दिसून येते, या मंदिराचे सेवेकरी मनोभावे मातेची सेवा करतात, माता भक्तांना आशीर्वाद देते असे भाविक सांगतात, आजही मरि माय भक्तांच्या हाकेला धावून येते, असे सुद्धा भाविक सांगतात,मरि माता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते,या चंडिका माता मंदिराचे पुजारी म्हणून कांतोळे महाराज सेवा देतात,
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)