समर्थ कृषी महाविद्यालयात डॉ पंजाबराव देशमुख शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्षानिमित्त व्याख्यान संपन्न

समर्थ कृषी महाविद्यालयात डॉ पंजाबराव देशमुख शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्षानिमित्त व्याख्यान संपन्न

भाऊसाहेबांच्या कृषी शिक्षणाचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. कीर्ति काळमेघ

श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था, उंबरखेड द्वारा संचालित डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ,अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय ,अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ नितीन मेहेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानाप्रसंगी श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शशांक देशमुख यांनी सर्वप्रथम वक्त्यांची ओळख करून दिली. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास निर्माण केलेले डॉ.भाऊसाहेबांची प्रतिमा व भाऊसाहेबांच्या जीवनावर आधारीत पुस्तक डॉ.शशांक देशमुख यांनी महाविद्यालयास भेट म्हणून दिले.या व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून नांदगाव कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर अमरावती येथील प्रा.कीर्ती काळमेघ-वनकर यांनी डॉ. पंजाबराव उपाख्यभाऊसाहेब देशमुख यांच्या समग्र कार्याचे वर्तमान आकलन या विषयावर विद्यार्थ्यांशी चर्चा करत असतांना भाऊसाहेबांच्या विविध पैलूंबद्दल माहिती देत आजच्या स्थितीमध्ये व्यावहारिक ज्ञान कसे गरजेचे आहे, तसेच शिक्षणासोबत आणि आधुनिकीकरणासोबत मातीशी असलेले नाते प्रत्येकाने विसरून चालणार नाही असे देखील सांगितले, समाजात कर्तव्यनिष्ठ वागने गरजेचे आहे समाजाप्रती, देशाप्रती असलेली आपली कर्तव्य प्रत्येकाने पूर्ण करावे हा संदेश भाऊसाहेबांच्या समग्र ज्ञानातून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा अश्विनी जाधव यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रा जयश्री कडू, प्रा विशाल अढाऊ, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा किरण ठाकरे, प्रा मोहजितसिंह राजपूत, प्रा सचिन सोळंकी, प्रा विलास सातपुते, प्रा विजय पवार, प्रा श्वेता धांडे, प्रा सोनाली इंगळे, प्रा ऋतुजा जाधव, प्रा अनिता सानप, प्रा प्रणाली पान्हेरकर, सहायक ग्रंथपाल अर्चना जत्ती, सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]