स्व दादासाहेब हावरे कला महाविद्यालयात नशामुक्ती पथनाट्य सादर

स्व दादासाहेब हावरे कला महाविद्यालयात नशामुक्ती पथनाट्य सादर

स्थानिक स्व दादासाहेब हावरे कला महाविद्यालय पथ्रोट येथे रासेयो पथकाच्या वतीने नशामुक्ती पथनाट्य सादर करण्यात आले, यावेळी पथनाट्यापूर्वी महाविद्यालयात रासेयो पथकाच्या वतीने त्रिमुर्तीचे प्रतिमा पूजन करण्यात आले, नंतर महाविद्यालयीन परिसरात पथनाट्य सादर करण्यात आले.

 कार्यक्रमाकरिता आर्य समाज मंदिर येथे विद्यार्थ्यांनी नाशामुक्ती पथनाट्य सादर करीत असताना या पथनाट्यामध्ये दारू, गुटखा, तंबाखू इतर अमली पदार्थ यांच्या माध्यमातून समाजातील तरुण पिढी कशी व्यसनाच्या अधीन जात आहे, हे पथनाट्याचा माध्यमातून समजावून सांगितले, या कार्यक्रमाकरिता पथ्रोट पोलिस स्टशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता कराळे, गावचे पोलिस पाटील नितीन गोरले, त्यानंतर आर्यसमाज मंदिर प्रधान रामेश्वरजी काकड, प्रशांत गोरले पत्रकार दैनिक पुण्यनगरी, पत्रकार दांडगे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एस डी बोंद्रे उपस्थित होते, यावेळी प्राचार्यांनी “व्यसन हे समाजाला लागलेली एक कीड आहे आणि व्यसनामुळे जिथे मुलाच्या खांद्यावर वडिलांची अर्थी जायला पाहिजे तिथे वडिलांच्या खांद्यावर मुलांची अर्थी जाते आहे” असे प्रतिपादन केले, कराळे मॅडम यांनी उद्बोधन करताना “आजचा तरुण आपल्या मार्गावरून भरकटत असून तो ना नैराश्याच्या गर्तेत ओढला गेल्यामुळे व्यसनाच्या अधीन जात आहे त्यामुळे सभोवतालचे वातावरण गढूळ झाले आहे, जोपर्यंत स्वतःहून जनसामान्यांचा प्रतिसाद या गोष्टीला मिळत नाही तोपर्यंत नशमुक्ती अशक्य आहे” असे प्रतिपादन केले, यावेळी पोलिस पाटील नितीनजी गोरले यांनी प्रतिपादन केले, या पथनत्यामधे राष्ट्र सेवा दल अमरावती जिल्हा प्रमुख आकाश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश खणवे, प्रज्वल भुमरे, अनुराधा मस्करे, ऋतुजा इंगोले, प्रिया फरकुंडे, दिपक शेंडे, रोशन पातोंड, साक्षी कावरे, कांचन चव्हाण, साक्षी दांडगे, पल्लवी उके, प्रतीक्षा मोगरे, नम्रता उपरिकर, स्वाती उपरीकर, नंदिनी सोळंके, आचल करंबे, प्रणिता खांडेकर आदी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश इंगळे यांनी तर आभार प्राध्यापक व्ही डी बोंद्रे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. यु जे खरड, प्रा. रोशनी डोंगरे, निशांत दामले, एम व्ही खेडकर, रवी ताळमे तसेच ऋषिकेश तनोरकर, ऋषिकेश काळे, जय मिसळकर, अंकुश इंगळे, आकाश बगाळे या विद्यार्थ्यांनी सुद्धा परिश्रम घेतले.

Spread the love
[democracy id="1"]