अंजनगाव सुर्जी येथे निघणार भव्य जनआक्रोश मोर्चा
शाळा बचाव संघर्ष समीतीचे आयोजन
तालूक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे पत्रकारपरिषदेत आव्हान
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालूका प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने शासकीय नोकऱ्याचे खासगीकरण व सरकारी शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे पुन्हा या देशात मनूवादी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असून शासनाच्या धोरणाविरोधात अंजनगाव सुर्जी येथे दि.१७ आक्टोंबर ला भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले असुन या मोर्चात तालूक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान पत्रकार परिषदेत आयोजकांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने दि.६ आक्टोंबर २०२३ ला शासकीय नोकऱ्यांचे खासजगीकरण करण्याचा निर्णय घेतला सदर शाशकीय तुघलकी फर्मान गोरगरिब बहुजनांची मुले शिकु नये यासाठी महाराष्ट्रातील ६२ हजार शासकीय शाळा बंद करण्याचा शासनाचे कटकारस्थान असुन शेकडो वर्षापुर्वीचे मनूवादी धोरण आडमार्गाने राबवाण्याचा निर्णयच शासना ने घेतला असुन यामुळे गोरगरिब बहुजनांची मुले शिकु नये हेच शासनाचे धोरण असल्याचे निदर्शनास येत असताना अतिश्रीमंत व्यक्तींच्या घशात शाळा,दवाखाने घालण्याचा निर्णया विरोधात बहुसंख्येने जर आज आपण पेटून उठलो नाही तर येणारे भविष्य फार कठीण असणार आहे,म्हणुन दि.१७ ला दुपारी १ वाजता पान अटाई जयस्तंभ चौक अंजनगाव सुर्जी येथून निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चात तालूक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान पत्रकार परिषदेत जनआक्रोष मोर्चा मुख्य समन्वयक प्रविण पेटकर, प्रमोद दाळू तालूका अध्यक्ष काँग्रेस ,प्रदिप येवले राष्ट्रवादी काँग्रेस , संजय अभ्यंकर,महेश खारोळे शिवसेना ऊ,बा.ठा. , सिद्दार्थ सावळे,सीमा बोके जिजाऊ ब्रिगेड,अफसर बेग,सविता पेटकर,मो.फयुमुद्दिन,जहिर मार्झा,नझीम खतीब,अशफाक अली यांनी केले आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)