रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा….!!
२६ गरजू रूग्णांना आरोग्यदायी मदतीचा हात…!!
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व स्मृती सेवाश्रम नया अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने …
दि. १०-१०-२०२३ रोजी आरोग्य शिबिर संपन्न झाले.
त्यापैकी ३२ गरजू रुग्णांना मोतीबिंदू , हृदयविकार, हरनिया, गाठीचे आजार तसेच विविध रोगावरील शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले.
या शिबिरात रोहनखेड, टाकळी, चंडिकापूर, वलगाव, टाकरखेडा, नांदुरा, पथ्रोट, अचलपूर, सालोरा, कुष्ठा बु.,तिवसा, पोही, सावळापूर, ब्राह्मणवाडा थडी, वडगाव माहोरे या गावातील रुग्णांनी सहभाग घेतला. या शिबिराचे आयोजन माजी जि. प. सदस्य प्रकाश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर काळे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय साबळे, मा. दिवाकरराव सगने, रुग्णसेविका चवरे ताई, आदी मंडळी उपस्थित होती.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)