हिवरखेड आकोट मार्गावर मोठं मोठे खड्डे,
तर पुलाच्या बाजूला लोखंडी कडगरे नसल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका
हिवरखेड आकोट मार्गावर मुख्य ठीक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तसेच याच मार्गावर येत असलेले पूल त्या पुलाला कडगरे नसल्याने प्रवाशांना रात्री वेळी धोका निर्माण होतो, या खड्यानमुळे व कडगरे नसल्याने या मार्गावर नेहमी अपघात होत राहतात, मागील आठवड्यात या मार्गावर हिवरखेड नजीक येत असल्याने दुसऱ्या पुलावर गावातील एका तरुणांचा अपघात झाला व तो तरुण दवाखान्यात मरण पावला अशी बिकट परिस्थिती या रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्यानमुळे व पुलावर लोखंडी कडगरे नसल्याने झाली, अडगावं बु जवळ येत असलेल्या पुलाची तर बिकट परिस्थिती झाली, हा पूल पावसाळ्यात तर प्रवाशांचा मार्गच बंद करतो, अशी परिस्थिती राहिली,व शासनाने याकडे लक्ष न दिल्यास आणखी बळी जातील अशी प्रतिक्रिया व्यक्त करून प्रवाशी नाराजी व्यक्त करीत आहेत, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे बुजून पुलाच्या अवतीभवती कडगरे बसवावे अशी मागणी सुद्धा प्रवाशांन कडून केली जात आहे,
प्रतिक्रिया,
आकोट हिवरखेड या मार्गावर खड्डेत पडलेच त्या सोबतच या मार्गावर येत असलेले पूल या पुलाना लोखंडे कडगरे नसल्याने रात्री वेळी आम्हा प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला, या मार्गावरील खड्डे बुजून पुलाच्या अवतीभवती कडगरे बसविले तर मोठा अनर्थ टळेल,
सुभाष केदार,
सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक
चंदनपूर
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)