अंजनगाव सुर्जी तालुका यांनी नायब तहसीलदार याना निवेदन दिले.

श्री.मा. एकनाथ रावजी शिंदे सरकारने 6 सप्टेंबर 2023 ला कंत्राटी पद्धतीने नोकर भरती 138 संवर्गातील घेतलेला निर्णय आरक्षण विरोधी,लोकशाही विरोधी, नागरिकांन विरोधी होऊ नये म्हणून जनसामान्य माणसात वीटबिगारी, बेरोजगारीत वाढ होऊ नये म्हणून खाजगी नोकरी भरतीचा निर्णय रद्द करणे अपेक्षित आहे तसेच , शिक्षण क्षेत्रातील शाळा खाजगी करण्या चा निर्णय रद्द न झाल्यास सामान्य नागरिकांचे मुले-मुली शिक्षना पासून वंचित राहील हा संविधानातील नागरिकांचा हक्क हिरावून घेतल्या सारखे होईल , शाळा खाजगी करनाच्या ऐवजी शिक्षणाच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे.
1) शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भरा
2) कमी पट संख्येची करणे देऊन कोणतीच शाळा बंद करू नका
3) सक्तीचे मोफत गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रत्येक बालकाचा अधिकार आहे. त्यासाठी शिक्षकांना केवळ शिकवू द्या , इतर कामाचा बोजा शिक्षकांवर देऊ नये
4)शिक्षणावरील खर्च वाढवून तो राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% एवढा करावा ही मतदाराने मतदान करून एकनाथ रावजी शिंदे सरकार ला संविधाना प्रमाणे सरकार चालवण्याची संधी दिली त्या मतदाराचे शैक्षणिक व आरोग्य व इतर त्या आम जनतेच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे ही सरकारला आम आदमी पार्टीअंजनगाव सुर्जी चे अध्यक्ष भैय्यासाहेब खंडारे व प्रवीण केने ,गजानन खंडारे, शुभम बहिरे ,रविंद्र राक्षसकर ,सुनील खंडारे, सुबोध हंबर्डे ,आदित्य लव्हाळे ,आदेश काळे, सचिन नागे ,अमोल वानखडे , गोविंद लोळम दिलीप खंडारे .यांच्या सुचने वरून अंजनगाव सुर्जी तालुका यांनी नायब तहसीलदार याना निवेदन सादर केलं .

Spread the love
[democracy id="1"]