राज्य व महामार्गावरील अपघाताची मालीका थांबवण्यास सां.बा.विभागाने उपाययोजना कराव्यात
अंजनगांव सुर्जी विचारमंचच्या वतीने दिले निवेदन
महेन्द्र भगत सह संपादक अंजनगाव एक्स्प्रेस
अंजनगाव सुर्जी दर्यापुर राज्यमार्गावर गेल्या दोन वर्षात झालेल्या अपघातात अनेकांचे जीव गेले असुन महामार्गावर अपघाताची मालीका सतत सुरु राहत असल्याने सार्वजनीक बांधकाम विभागाने या मार्गावर तात्काळ उपाययोजना कराव्यात तसेच प्रत्येक थांब्यावर गतिरोधक बसवावे अशा आशयाचे निवेदन अंजनगाव सुर्जी शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी अंजनगाव विचारमंच या व्हाट्सअप ग्रुप च्या झालेल्या चर्चेनंतर दि.२६ सप्टेंबरला देण्यात आले.
अंजनगाव दर्यापुर राज्यमार्गाची काही वर्षाअगोदर अंत्यंत दुरावस्था झाली होती.परंतू दोन वर्षापुर्वी ह्या मार्गाचे संपुर्ण नूतनीकरण करण्यात येऊन नविन आणि चांगला मार्ग तयार करण्यात आला. काही दिवसानंतर यावर वाहतूक सुरु झाली.परंतू रस्ता खड्डे आणि गतीरोधक विरहीत असल्याने वाहन चालवणाऱ्यांनी या रस्त्यावर प्रचंड वेगाने वाहने चालवण्याचे प्रकार वाढले.ज्यामुळे अपघाताची मालीका जी दोन वर्षापासून सुरु झाली ती थांबायलाच तयार नाही.या तीस कीलोमीटरच्या रस्त्यामध्ये दररोज कुठे ना कुठे अपघात होत असतो.ज्यामध्ये कुणी आपले हातपाय गमाऊन बसतो तर कुणाला जीव गमवावा लागत असताना या दोन वर्षीचा प्रानघातक अपघाताची संख्या पाहता तथा त्यात झालेल्या मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या पाहता हा मृत्यूचा महामार्ग होण्यापुर्वी या रस्त्यावर गतीरोधक बसवण्याची मागणी नागरीकान कडुन वारवार होत आहे तसेच झालेला रस्ता अरुंद असल्यानेही अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणने असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर अपघात का होतात यावर उपाय योजना कराव्या, व अधीकची जिवीत वा वित्तहाणी होण्याचे पुर्वी मार्गावरील प्रत्येक थांब्यावर गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणीअंजनगाव विचारमंच या वाॕट्सअॕप गृपच्या माध्यमातून झालेल्या चर्चे नंतर सर्व नागरीकांनी कार्यकारी अभियंता यांना उपविभागीय अभियंता याच्यामार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .
यावेळी माजीनगरसेवक अवीनाश गायगोले,शंकर मालठाने,शिवसेनेचे शहरप्रमुख मुन्ना ईसोकार ,संघटक राजु गीरी ,मोईन खान,दिपक अढाऊ,पत्रकार नागेश गोळे ,प्रवीण बोके,उमेश काकड ,युवा स्वाभीमानचे अजय देशमुख,अमोल कावरे,मनोज खाडे , किशोर मांगुळकर इत्यादींच्या उपस्थितीत देण्यात आले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)