वान प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग सुरू

वान प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग सुरू

हनुमान सागर चा एकूण जलसाठा 98.22 % वर पोहचला
हिवरखेड:-
हिवरखेड नजिकच्या वारी येथील वान प्रकल्प हनुमान सागर चा एकूण जलसाठा 98.22 % वर पोहचला आहे. त्यामुळे वान प्रकल्पाचे दि. २५/०९/२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता एकूण २ वक्रद्वारे प्रत्येकी २० सेमी उंचीने उघडण्यात आले असून नदीपात्रात एकूण ३६.०० घ.मी./से एवढा विसर्ग सोडण्यात येत पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन वान प्रकल्प शाखा अभियंता नयन लोणारे यांनी केले आहे.
परिसरातील सर्वात मोठे धरण म्हणून प्रसिद्ध असलेले वारी भैरवगड येथील श्री. हनुमान सागर दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पूर्ण भरून या परिसरातील शेतकऱ्यांच्या उन्हाळ्यातील पिकाचे स्वप्न पूर्ण करेल तसेच 84 खेडी नागरिकांची तहान भागवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अकोला व बुलढाणा जिल्ह्यात हनुमान सागर प्रकल्प मार्फत वान प्रकल्पाचे पाणी आरक्षण पुढील प्रमाणे आहे 1=अकोट शहर पाणीपुरवठा योजना =8.66 दलघमी,जळगाव जामोद, 2=तेल्हारा शहर पाणीपुरवठा योजना= 3.16 दलघमी,3=शेगाव शहर पाणीपुरवठा योजना=5.62 दलघमी,
4=84 खेडी पाणीपुरवठा योजना ता.तेल्हारा व अकोट,=4.239 दलघमी
5=जळगाव जामोद पाणीपुरवठा योजना= 4.02 दलघमी,6=140 गावे जळगाव जामोद तहसील मधील पाणी पुरवठा योजना =8.454 दलघमी 7= तेल्हारा व अकोट 159 गावची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना =3.753
दलघमी ,8=बाळापुर व अकोला तालुक्यातील 69 गावांची पाणीपुरवठा योजना =3.35 असे
एकूण 41.256 दलघमी एवढे पाणी श्री हनुमान सागर मधून आरक्षित करण्यात आले आहे. तसेच अकोला शहर अमृत पाणीपुरवठा योजना 24.00 दलघमी याला स्थगिती आहे.अशी माहिती वान प्रकल्प शाखा अभियंता नयन लोणारे यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Spread the love
[democracy id="1"]