दर्यापूर मतदारसंघातील प्रलंबीत समस्या तातडीने सोडवा- आमदार बळवंत वानखडे

दर्यापूर मतदारसंघातील प्रलंबीत समस्या तातडीने सोडवा- आमदार बळवंत वानखडे

दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे आढावा बैठक संपन्न

दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबीत विषयाची आढावा बैठक श्री सौरभ कटियार जिल्हाधिकारी अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे पार पडली.

दर्यापूर विधानसभा क्षेत्रातील बहुतांश भाग पट्ट्याचा आहे. या भागातील जमिनीच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक असल्याने सिंचन करणे अशक्य आहे. केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवन योजने अंतर्गत चंद्रभागा बॅरेज लघु पाटबंधारे प्रकल्प , सामदा सौंदळीं लघु पाटबंधारे प्रकल्प , वाघाडी बॅरेज लघु पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत पुर्ण झालेली कामे, प्रलंबित असलेली कामे, बंद पाईप लाईन वितरण प्रणालीचे कामे, पुनर्वसन अभावी रखडलेली भुसंपादनाची कामे, सदर प्रकल्पाने बाधीत पुनर्वसन झालेल्या गावातील मुलभुत सुविधाचे कामे, घळभरणी करण्याचे निश्चित नियोजन , प्रकल्पामुळे बाधीत रस्त्यांची पर्यायी व्यवस्था, प्रलंबित सुप्रमा या विविध तसेच शासनाकडे प्रलंबित विषयासंबधी सदर बैठकीत चर्चा झाली.

चंद्रभागा बॅरेज लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित असदपूर आणि शहापूर ता. अचलपूर या दोन गावांचे पुनर्वसन झाले असून सदर पुनर्वसनात मूलभूत सुविधा , रस्ते , नाल्या , पुलाचे कामे , शाळा इमारत , वर्गखोली इमारत , ग्रामपंचायत कार्यालय , समाजमंदिर , अंगणवाडी इमारत ,स्वच्छतागृह , पाणीपुरवठा कामे , पाईपलाईन ची कामे , पाण्याचे टाकीचे बांधकाम , विद्युतविषयक कामे मागील ४ वर्षाच्या कालावधीत पूर्ण झाले आहे. दिनांक २३ जून २०२३ रोजी असदपूर आणि शहापूर येथील पुनर्वसनात आमदार बळवंत वानखडे यांनी जलसंपदा विभागाच्या अभियंत्यासमवेत प्रत्यक्ष भेट दिली असता मूलभूत सुविधेचे कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले असून पुनर्वसनातील रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली आहे , नाल्यांची अतिशय दुरावस्था झाली असून तडे गेलेले आहे, पुनर्वसनातील पुलांना देखील तडे गेलेले आहे. शाळेच्या इमारतीमधील वर्गखोलीमधील भिंतीची तसेच खिडक्यांची छपाई अक्षरशा हाताने निघत असून या इमारतीमध्ये विद्यार्थी आल्यास त्यांच्या जीवितास धोखा निर्माण होऊ शकतो. शाळेतील शौचालयाच्या भिंतींना तडे गेले असून शौचालयाचा स्लॅब हाताने हलत आहे त्यामुळे ते वापरण्यायोग्य नाही.अंगणवाडीमधील टाईल्स ला तडे गेले आहे . पाणी पुरवठ्याची पाईपलाईन अक्षरशा बाहेर अली असून स्पष्टपणे दिसत आहे. असे अनेक निकृष्ट दर्जाचे कामे निदर्शनास आली आहे . त्याअनुषगाने संबंधित कंत्राट दाराला काळ्या यादीत टाकून कठोर कार्यवाही करण्याची सूचना आमदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना केली

नगर परिषद दर्यापूर हद्दवाढीमुळे नव्याने समाविष्ट झालेल्या परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याची सूचना सदर बैठकीत करण्यात आली यात प्रामुख्याने हद्दवाढ झालेल्या भागात पथदिव्यांची व्यवस्था करणे , हद्दवाढ झालेल्या भागात नाले साफ सफाई आणि कचरा गाडी पहोचून कचरा संकलित करणे , हद्दवाढ झालेल्या भागात रस्ते नाली आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विकास आराखडा तयार करणे या मुख्य बाबींवर चर्चा करण्यात आली तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिद्धार्थ नगर , मातंग पुरा , रमाबाई आंबेडकर नगर , टाटा नगर , दीक्षाभूमी नगर , भीम नगर , मारोती नगर या भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करणे , चौधरी ले- आउट मधील सरसकट सर्व लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात यावे आणि आठवडी बाजारात राहणाऱ्या फासे पारधी समाजाच्या नागरिकांना तातडीने जागा उपलब्ध करून देण्याबाबत सदर बैठकीत सूचना करण्यात आली

 

सुकळी ता. दर्यापूर येथे सन २०१३ पासून मोठ्या प्रमाणात भूसख्खलन होत आहे. गावाभोवताल नदीकाठाची जमीन खचत असल्याने जवळपास गावातील ३० टक्के जमीन भूसख्खलनाने खचली असून गावातील घरे देखील जमीनदोस्त झाली आहेत. तसेच बहुतांश घरे खचण्याच्या मार्गावर आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात सुकळी येथील गावाभोवतालच्या जमिनीस भेगा पडत असून पाऊस पडल्या नंतर जमिनीचा भाग भूसख्खलनाने खचत जातो. याबाबत गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काठावरील राहिलेल्या लोकांच्या मनात दहशत आहे. सदर गावातील परिस्थिती अतिशय भंयकर असुन नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. सदर गावाचे पुनर्वसन करण्यास स्थानिक ग्रामस्थामध्ये संभ्रम आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थाना विश्वासात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत सूचना केली.

मजीप्रा अंतर्गत दर्यापूर संघातील संपुर्ण गावे समाविष्ट असून सर्व गावातील पाणीपुरवठा मजीप्रावर अवलंबुन आहे. १५६ गावे योजना नविन योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. जलशुध्दीकरण केंद्राचे काम सुरू झालेले नाही. म.जि. प्रा. ढिस्साळ नियोजनामुळे अनेक गावात अजुनही पावसाळा असुन पाण्याच्या तक्रारी आहेत. कुत्रिम पाणी टंचाई निर्माण होत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना सदर बैठकीत करण्यात आली

सदर बैठकीला श्री सौरभ कटियार् , जिल्हाधिकारी अमरावती , श्री घोडगे , निवासी उपजिल्हाधिकारी ,श्री अनिल भटकर जिल्हा पुनर्वसन अधिकारी , श्री उमप कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग अमरावती , श्री रवींद्र कानडजे तहसीलदार दर्यापूर , श्री शेंडे उपविभागीय अभियंता मजीप्रा , श्री अनिल बागडे , असलम घानिवाला , प्रकाश चव्हाण माजी नगरसेवक दर्यापूर आदी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]