पणज येथे श्री महालक्ष्मी माता मंदिरात यात्रा महोत्सवाचे आयोजन
प्राचीन काळापासुन तसेच तीनशे वर्षापेक्षा जास्त जुने असलेले पणज येथील महालक्ष्मी मातेचे मंदिर
संजय गवळी
अकोट तालुका प्रतिनिधी
सातपुडा पर्वताच्या कुशीत व बोर्डी नदीच्या काठावर असलेल्या आकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 ला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ज्येष्ठा गौरी पुजना निमित्त श्री महालक्ष्मी माता मंदिर पणज येथे भव्य यात्रा महोत्सव व महाप्रसादाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी पणज यांनी केले आहे तसेच पणज या गावाने कबड्डी खेळासह केळी उत्पादनासाठी विदर्भात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याचबरोबर गावाने एक अध्यात्मिक वेगळेपणा सुद्धा जपला आहे तो म्हणजे येथील प्रसिद्ध प्राचीन गौरी महालक्ष्मीचे मंदिर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले पणज गावाची ओळख प्रयोगशील शेतकऱ्याचे गाव म्हणून आहे गावात शहानुर वाघोडा प्रकल्प असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे यासह गावात तीनशे वर्ष पुरातन काळापासुन असलेले जुने गौरी महालक्ष्मी मातेचे मंदिर असल्याने गावाला आध्यात्मिक व पौराणिक वारसा सुद्धा प्राप्त झाला आहे येथील महालक्ष्मी मातेच्या पुरातन मंदिर संदर्भात एक आख्यायिका आहे त्यानुसार पुरातन काळी पणज पासून जवळ असलेल्या महागावातील दोन सासुरवाशी बहिणी व आपल्या चिमुकल्या लहान भावाला बैलगाडीत घेऊन बोर्डी नदीच्या पात्राने वडाळी देशमुख गावाकडे निघाल्या होत्या त्यांनी बैलगाडी वाल्याला मागे न पाहण्यास सांगितले मात्र गावाजवळील वाहत्या बोर्डी नदीच्या तीराजवळ आल्यानंतर बैलगाडी वाल्याने मागे वळून पाहिले त्याच क्षणी दोन्ही सासरवासी बहिणी व भाऊ मूर्तीत रूपांतरित झाले व सासरवासीनी पणज गावातच कायमच्या माहेरवाशीनी झाल्या असे भाविक भक्ताकडून सांगितले जाते तेव्हापासून पणज गावात ज्येष्ठ गौरीपूजनाच्या दिवशी सतत तीन दिवस भाविक महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी येतात यासह मंगळवार व शुक्रवार सुद्धा भाविक श्रद्धेने मंदिरात येऊन तेथे पूजा अर्चना करतात या धार्मिक स्थळावर गावातील तसेच परिसरातील भाविक भक्त व मंदिर यात्रा समिती व समस्त गावकरी मंडळी महाप्रसादाचे आयोजन करत असतात या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार गावकऱ्यांकडून व परिसरातील गावकऱ्यांकडून १८८० करण्यात आला मंदिरात माता महालक्ष्मीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा १८८५ साली करण्यात आली लाखो नागरिकांचे श्रद्धास्थान आणी पणज ग्रामस्थांचे ग्राम दैवत असल्यामुळे भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातून दूरवरून पणज नगरीत दाखल होतात, तसेच
गौरी पूजनाच्या तीन दिवस गावात विविध कार्यक्रमासह दिवाळी सारखा ज्येष्ठा गौरी उत्सव साजरा केला जातो
पणज हे गाव महालक्ष्मी मातेचे माहेर घर असल्याने महाराष्ट्रातील तसेच देशातील एकमेव हे मंदिर असल्याचा दावा भक्तगण करतात त्यामुळे परिसरात येणाऱ्या अनेक गावांमधील माहेरी येणारी प्रत्येक सासरवासिनी या मंदिरात आवर्जून दर्शनाला येते गौरी पूजनाच्या तीन दिवस गावामध्ये अक्षरशा दिवाळी साजरी करण्यात येते तसेच नवरात्राचे नऊ दिवस मंगळवारी भक्तांच्या रांगा व अलोट गर्दी असते,
मंदीराच्या बाजुला पुरातन
मंदिर परिसरात दीपमाला व पाय विहीर आहे पाय विहिरीतून यात्रेत भंडारा करायला भांडीकुंडी आपोआप प्राप्त व्हायची व भंडारा संपल्यानंतर आपोआप विसर्जित व्हायची पाय विहिरीतील खालच्या पायरीला मोठा साकळदंड असून खालच्या पायरीवरून भाविका आणायचे असे भाविक सांगतात यात्रे करीता गावकऱ्यांसह आजुबाजुच्या गावातील भावीक सुद्धा तन-मन-धनाने आपली सेवा देतात
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)