अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कृषि कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कृषि कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या

शेतकरी रिकाम्या खुर्च्या पाहून जातो माघारी

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कृषि कार्यालय नसुन कुपोषित कार्यालय बनले आहे दररोज तालुक्यातील शेतकरी कृषि कार्यालयात शेती विषयक कामासाठी जातोय खरा मात्र कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहून परत माघारी फिरत असल्याची वारंवार तक्रार तालुक्यातील शेतकरी करीत असतात.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या अधिकारी, कर्मचारी यांना भेटण्यासाठी जातात तेव्हा कार्यालयात एखाद कर्मचारी शिवाय कोणीच आढळून येते नाहीत आणि हे नित्याचेच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे फोन केला तर मी या गावात आहे त्या गावात आहे असल्याचे सांगीतले जाते. तर शेतकरी कर्मचाऱ्यांना भेटणार कधी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शासन म्हणते शासन, प्रशासन हे शेतकऱ्यांच्या बांधावर परंतु अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कृषी कार्यालयाची परिस्थिती ही ना बांधावर ना कार्यालयात अशी झाली आहे. अंजनगाव सुर्जी कृषी कार्यालयाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी, वरीष्ठ अधिकारी यांचा वचक नसल्याचे दिसून येते आजही दिनांक 18 सप्टेंबर रोजी काही शेतकरी कृषि सहाय्यक यांना भेटण्यासाठी गेले असता कार्यालयात कोणीच आढळून आले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले.

कृषि सहाय्यक यांना फील्ड वर्क राहते ते येथे बसत नाहीत कारण त्यांचे हेडक्वार्टर येथे नाही जेव्हा महत्वाची बैठक असते किंवा अती महत्वावे कार्यालयात काम पडल्यास आम्ही त्यांना बोलावून घेतो.
रा. भी. तराळ
कृषि अधिकारी अंजनगाव सुर्जी

जेव्हा ही कृषी कार्यालयात शेती विषयक कामासाठी जातो तेव्हा कार्यालयात कोणीच दिसत नाही सर्व खुर्च्या रिकाम्या दिसतात फोन लावल्यास उचलत नाही जर उचलला तर मी या गावात आहे त्या गावात आहे असल्याचे सांगतात मग आम्ही यांना कधी भेटणार.
सर्व शेतकरी
अंजनगाव सुर्जी.

Spread the love
[democracy id="1"]