अकोट मुख्य रस्त्यांवर खड्डे तात्काळ दुरुस्त करा युवासेना व शिवसेना नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्याला निविदेन

अकोट मुख्य रस्त्यांवर खड्डे तात्काळ दुरुस्त करा

युवासेना व शिवसेना नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्याला निविदेन

संजय गवळी अकोट तालुका प्रतिनिधी

मा.आमदार जि.प्र.नितीन देशमुख,जि.प्र. गोपाल दातकर,मा. आमदार संजय गावंडे,युवासेना वि. अँड.वाणी,युवासेना जि.प्र. दीपक बोचरे, उप प्र. दिलीप बोचे व युवासेना उप प्र. मनीष कराळे यांच्या नेतृत्वात संघटक विजय ढेपे,शि.अकोट ता. प्र. ब्रम्हा पांडे, कार्तिक गावंडे,प्रदीप राऊत,राहुल पाचडे,अमोल पालेकर, सुभाष सुरत्ने,रोशन पर्वतकर,यांच्या प्रमुख उपस्थितीत

अकोट नगरपरिषद मुख्याधिकारी यांना अकोट शहरातील मुख्य रस्त्यावरील जीवघेणे खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावे या मागणीच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले.
श्रावण महिना सुरू असून हिंदू धर्मातील मुख्य धार्मिक सण उत्सव सद्यस्थितीत सुरू झालेले आहेत या दरम्यान शहरातून दरवर्षी नुसार मोठमोठ्या मिरवणुका निघतात यामध्ये प्रामुख्याने कावड उत्सव,दहीहंडी उत्सव,गणपती,नवदुर्गा नवरात्र उत्सव इ.मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी होत असतात.
परंतु सद्यस्थितीत शहरातील एकही मुख्य रस्ता खडेमुत्त नाही ही परिस्थिती आजच नाही तर कीत्येक वर्षापासुन आहे पण नगर परीषद प्रशासनाला याचे काही सोयर सुतक नाही.एकतर मुख्याधिकारी यांना रोडवरुन दररोज प्रवास करावा लागत नाही कींवा संबंधितांच्या मुलाबाळांना कुटुबांला सुद्धा नाहीच त्यामुळे मग त्यांना कस कळणार की सर्वसामान्य नागरिकांना काय ञास आहे.अकोट शहरातील रोडवरील जिवघेणे खड्डे जर प्रशासनाला दिसत नसतील तर त्यांना कोणत्या नबंरचा चष्मा लावयाला पाहीजे हे त्यांनी ठरवावे नाही तर आकोट शहरातील जनता ही त्यांना कोणत्या नबंरचा चष्मा पाहीजे हे दाखवून देईल त्यातुन मग त्यांना हे सर्व खड्डेमय रस्ते दिसतील,लाखोच्या संख्येने शहर असून शहरात दररोज हजारो शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी,क्लासेससाठी सदर रस्त्याने ये जा करतात त्यामध्ये लहान मोठे विद्यार्थी आपला हा प्रवास सायकल,मोटर सायकलने जिव मुठीत धरून करत आहेत.नगरपालिकेच्या अशा गचाळ कारभारामुळे जनतेसह विद्यार्थी देखील आता हतबल झालेले आहेत कारण न.पा.चे नियोजन शून्य आहे.
आज रोजी नगरपरीषदवर प्रशासक असतांना कोट्यवधी रुपयाचा निधी न.पा.कडे उपलब्ध असतांना ते या रस्ताचे नियोजन करुन खड्डे मुक्त शहर का करत नाहीत असा प्रश्न जनतेला पडला, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]