गोपाळकाल्याच्या वाटपातून दिला एकात्मतेचा संदेश.
स्थानिक शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूल शिवाजीनगर अमरावती येथे दिनांक 7 सप्टेंबर2023 गुरुवार रोजी दहीहंडी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य सौ वैशाली ठाकरे मॅडम शाळेच्या पर्यवेक्षिका सौ शारदा फुले मॅडम शिक्षक प्रतिनिधी सौ अपर्णा होणाडे, शुभांगी नंदनवार उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख तसेच भगवान श्री कृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करत झाली या प्रसंगी शाळेच्या संगीत शिक्षिका श्रद्धा उपाध्ये मॅडम यांनी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध नृत्य आणि नाटिकांचे सादरीकरण करून भगवान श्रीकृष्ण यांनी दिलेला संदेश तसेच बाळगोपाळांच्या माध्यमातून बाललीला दर्शवत विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांचे सादरीकरण केले छोट्या छोट्या राधा कृष्णांनी छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल या गीतावर नृत्य आपल्या शिक्षकांसोबत सादर करून वातावरण मंगलमय केले त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा जन्म करून पाळणा हलवण्यात आला गोपाळकाला म्हणजे सर्व जाती धर्म पंथ एकत्र येणे याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून आपल्या धार्मिक परंपरेचे दर्शन घडवले . शाळेच्या प्राचार्या सौ वैशाली ठाकरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णाचे बालपण आणि त्यांनी मानव जातीला दिलेले भगवत गीता नावाची गुरुकिल्ली याविषयी मार्गदर्शन केले शाळेच्या पर्यवेक्षिका सौ शारदा फुले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या जन्मावर एक सुंदर अशी कथा सांगून विद्यार्थ्यांना चांगले आणि वाईट प्रवृत्तीची ओळख कशी करावी हे पटवून दिले. कार्यक्रमाला सुशोभित करण्यासाठी शाळेच्या सा.शिक्षिका सौ. प्रतिभा पाचपोर मॅडम ,सौ प्रगती तिडके ,प्रेमलता शिरसाट ,कुमारी वैशाली दांडगे , स्नेहा माळी , कुमारी मयुरी पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे यशस्वीते करिता सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचा सहभाग दर्शविला.