ब्रेकिंग न्यूज
अंजनगाव सुर्जी येथे भर पावसात ग्रामीण रूग्णालयात जाणाऱ्या रस्त्याचे काँग्रॅटीकरण काम चालू
नगरपरिषद बांधकाम विभाग अधिकारी व सी वो अधिकारी यांचे अभय
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी येथिल ग्रामीण रुग्णालय येथे जाणारा रस्त्याचे भर पावसात काम चालु आहे. या वर नगर परिषद चे सी वो यांना काही नागरिकांनी फोन करून माहिती दिली परंतु सी वो यांनी कोणतेही गांभीर्य दाखविले नाही दुपारी 3 वाजे पर्यंत सी वो यांची नागरिकांनी वाट पाहली परंतु सी वो प्रशांत आले नाहीत आणि बांधकाम अभियंता मंगेश सुद्धा आले नाही परंतु शेवटी नागरिकांनी जेव्हा सी ओ यांना फोन लावला तेव्हा त्यांचा फोन बंद येत होता तर एवढी नागरिकांची तक्रार असुनही ठेकेदार यांनी काम चालु ठेवले जेव्हा नागरिकांनी ठेकेदार यांना विचारणा केली असता ठेकेदार यांनी सांगितले की कितीही पाउस आला तरी खालच्या कोड ला काहीच होत नाही मुख्य वरचा कोड आहे परंतु नागरिकांना पडलेला प्रश्न म्हणजे भर पावसात काँग्रॅटीकरण करणे काम योग्य नसल्यावरही भर पावसात काम काम चालु आहे आणि नगर पालिका प्रशासनाला माहिती असुनही काम बंद केले नाही तर पालिका मध्ये अजुनही प्रशासन राज आहे म्हणजे अंजनगाव सुर्जी नगर पालिका चे अधिकारी कर्मचारी अभियंता यांच्या कार्यकृतीवर नागरिकांचा संशय बळावला आहे
असे नागरिकांचे म्हणणे आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)