मोफत आधार अपडेट कॅम्प संपन्न
सामाजिक कार्यकर्ता शाहरुख लाला यांचा उपक्रम
हिवरखेड प्रतिनिधी:-
हिवरखेड येथील सामाजिक कार्यकर्ता शाहरुख लाला यांनी नागरिकांकरिता आधार कार्ड अपडेट, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, मतदान कार्ड, दुरुस्तीबाबत चार दिवसीय मोफत शिबिराचे आयोजन केले होते. त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भरभरून प्रतिसाद दिला. वार्ड क्रमांक चार आणि हिवरखेड परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना याचा फायदा झाला. दि. 8 ते 11 सप्टेंबर पर्यंत नागरिकांनी वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेऊन शिबिर यशस्वी केले.
मोफत शिबिर यशस्वी करण्यासाठी शाहरुख लाला व वार्ड क्रमांक चार मधील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सदर शिबिराला गावातील अनेक मान्यवर मंडळींनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक ठाणेदार गोविंदा पांडव होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार तेल्हारा राजेश गुरव साहेब होते. प्रमुख उपस्थितित
तलाठी शिलानंद तेलगोटे, किशोर गायकी, विद्या मावळे, कृषी सहाय्यक लक्ष्मी सदार, ग्रामविकास अधिकारी अनिल खुमकर, स्टेट बँक शाखाधिकारी राहुल बाभुळकर, मनोज चव्हाण, पत्रकार संदीप इंगळे, अर्जुन खिरोडकार, ग्रा,प सदस्य रंजाक भाई, मित्र परिवारातील जावेद पहेलवान ,सेदानी आधी मंडळी उपस्थित होते. यापुढे सुद्धा नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी सदैव अग्रेसर राहील अशी ग्वाही शाहरुख लाला यांनी दिली.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)