अवैध रेती वाहतूक करणाऱ्या चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल,
या आरोपी मध्ये २ ग्रामपंचायत आजी माजी सदस्यांचा सुद्धा समावेश आहेत,
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सौंदळा वारखेड या भागातील नाल्या खोऱ्यातुन अवैध रेतीची वाहतूक दि, ४,
सप्टेंबरच्या पहाटे सुरू असतांना संबधित तलाठी तेलंगोटे मैडम} यांना गोपनीय माहिती मिळाली असता, त्यांनी कोतवालच्या सहकाऱ्यांने अवैध रेती चोरट्यांनवर दबंग कारवाई केली, याबाबत तलाठी मैडम यांनी या घटनेबाबत जबानी तक्रार हिवरखेड पोलीस स्टेशनला नोंदवली यावरून हिवरखेड पोलिसांनी सदरचा गुन्हा दाखल केला, या कारवाईतील टँकटर क्र एम,एच,३७ एफ 0543 असून आरोपी राधेश्याम म्हसाये, शिवाजी सोनटक्के, शँकर इंगळे, अमोल तिखट, यांच्या विरुद्ध कलम ३७९,३५३,३४,महाराष्ट्र जमीन महसूल सहिता ४८ द्वारा गुन्हा दाखल करण्यात आला, याबाबत पोलिसांनि तपास करण्याची गती वाढून सदर गुन्ह्यातील टँकटर जप्त करावे ,अशी मागणी सुजान नागरिक करीत आहेत,
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)