हिवरखेड चंडिका चौकात लय भारी दहीहांडी साजरी गोविंदा गोपालानी फोडली हांडी

हिवरखेड चंडिका चौकात लय भारी दहीहांडी साजरी,

गोविंदा गोपालानी फोडली हांडी,

हिवरखेड चंडिका चौकात गोकुळ अष्टमी गोपाल काला दिनी चौकातील गोविंदा गोपालांनि मटकी फोडून दहीहंडी उत्सव साजरा केला,ही लय भारी दहीहंडी असल्याचे पाहणाऱ्याच्या गर्दी वरून दिसून आले ,या उत्सवाने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आपल्याकडे आकर्षीत केले, चौकातील भाविक महिला पुरुषांनी ही दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी केली, ही मटकी फोडण्यासाठी मोठ मोठे गोपालांचे थर निर्माण करण्यात आले,यामध्ये गोविदा गोपाल म्हणून मटकी फोडण्याचा बहुमान पत्रकार संघाचे सदस्य अनिल कवळकार यांनी पटकावला या दिनी पंचबुद्धे, बांते, कुकळे, कांनंतोडे, इत्यादी परिवाराच्या निवास्थानी श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करून महाप्रसाद वितरित करण्यात आला, तसेच मोठा महादेव संस्थान मध्ये सुद्धा दहीहंडी फोडण्यात आली, विविध ठीक ठिकाणी शाळा कॉलेज मध्ये सुद्धा हा उत्सव साजरा करण्यात आला,गावात गोविदा गोपाला दिवसभर असे भाविक शब्द आयकण्यास मिळाले, हिवरखेड पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त होता,

Spread the love
[democracy id="1"]